अडीच महिन्यांनतर नाशकातील मॉल्स उघडले

अडीच महिन्यांनतर नाशकातील मॉल्स उघडले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरातील मॉल उघडायला ५० टक्क्यांच्या उपस्थितीत परवानगी मिळाल्यानंतर मॉलमध्ये गर्दी दिसून आली नाही. परंतु,कोरोनाच्या नियमांचे पालन होताना दिसून आले...

साधारण अडीच ते तीन महिन्यांपासून नाशिक शहरातील मॉल्स कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे बंद अवस्थेत होते.

बऱ्याच प्रतीक्षेनंतर सोमवारी (दि. २१) मॉल्स सुरु करण्यात आले. नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सिटी सेंटर मॉल येथे तुरळक गर्दी दिसून आली. मॉल प्रशासनाच्या वतीने मॉलच्या आत प्रवेश करणाऱ्या नागरिकांचे मास्क, सॅनिटायझरने हात स्वछ करणे व शरीराचे तापमान तपासण्यात येत होते.

यासोबतच मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना सामाजिक अंतर ठेवण्यासाठी सांगण्यात येत होते. कॉलेजरोडवरील बिग बाजारमध्येदेखील कोरोनाचे नियम पाळण्यात येऊन ५० टक्के उपस्थितीत मॉलचे कामकाज सुरु होते.

नाशिकरोड परिसरात गेल्या तीन महिन्यापासून बंद असलेले मॉल्स व बिग बाजार सुरु करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली. परिणामी, नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या नेहरूनगर येथील श्री म्हसोबा मंदिरजवळ असलेले बिग बजार सुरू झाले.

बिग बाजार शासनाच्या नियमानुसार 50 टक्क क्षमतेने सुरू करण्यात आला. येणाऱ्या ग्राहकांना मास्क व सॅनिटायझर वापरण्याचे बंधन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून शासनाने विविध नियम लागू केले आहेत. या नियमांचे पालन करून बिग बाजार सुरू करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com