माल वाहतूकदारांना करोना अहवालाची सक्ती नाही

माल वाहतूकदारांना करोना अहवालाची सक्ती नाही

नाशिक । प्रतिनिधी

करोनाची साखळी तोडण्यासाठी सध्या लागू असलेल्या टाळेबंदीची मुदत 1 जूनपर्यंत वाढविताना परराज्यातून येणार्‍या माल वाहतूकदारांना करोना चाचणीचा नकारात्मक अहवाल सादर करण्याची अट राज्य शासनाने रद्द केली आहे.

धान्य, डाळी, भाजीपाला, फळे, औषधे, प्राणवायू आदी अत्यावश्यक सेवेची वाहतूक करणार्‍या माल वाहतूकदारांचे शरीराचे तापमान आणि अन्य लक्षणे नसल्याची खात्री करून त्यांना राज्यात प्रवेश दिला जाईल. परराज्यातून येणार्‍या माल वाहतूकदारांना राज्याच्या सीमेवर 48 तासांपूर्वी केलेल्या करोना चाचणीचा अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले.

परिणामी पहिल्याच दिवशी राज्याच्या सीमेवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. परराज्यातून भाजीपाला, डाळी, कडधान्ये, औषधे, वैद्यकीय उपकरणे, फळे मोठ्या प्रमाणावर येतात. त्यातच सध्या प्राणवायूची वाहतूक प्राधान्याने केली जाते.

करोना चाचणीचा अहवाल सादर करणे बंधनकारक केल्याने परराज्यातून अत्यावश्यक सेवा, औषधे, वैद्यकीय उपकरणे यांच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता होती. माल वाहतूकदारांच्या संघटनेनेही या निर्णयावर तीव्र नापसंती व्यक्त केली होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com