नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतान करोना मुक्तांचा आकडा वाढला आहे. मागील 24 तासात 150 रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत करोनामुक्त होणारांचा आकडा 1 लाख 10 हजार 492 वर पोहचला आहे. यामुळे जिल्ह्यात एकुण करोना मुक्तीचे प्रमाण 97.7 टक्केंवर पोहचले आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 144 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामुळे आतापर्यंत एकुण पॉझिटिव्हचा आकडा 1 लाख 13 हजार 830 इतका झाला आहे. यामध्ये नाशिक शहरातील 80 रुग्ण आहेत.

यामुळे नाशिक शहराचा आकडा 74 हजार 740 वर पोहचला आहे. आज ग्रामिण भागातील 56 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रुग्णांचा आकडा 33 हजार 317 झाला आहे. मालेगावचा आकडा 4 हजार 695 झाला आहेे. जिल्हा बाह्यचा आकडा 1 हजार 78 झाला आहे.

याबरोबरच करोना मृत्यूचे प्रमाण घटत असून शनिवारी दिवसभरात केवळ 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोघेही नाशिक शहरातील आहेत.

यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 2 हजार 31 झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्या संशयितांचा आकडाही कमी झाला असून दिवसभरात 512 नवे संशयित दाखल झाले आहेत. तर अद्याप 1 हजार 355 संशयितांचे अहवाल प्रलंबीत आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण कोरोना बाधित : 1,13,830

* नाशिक : 74,740

* मालेगाव : 4,695

* उर्वरित जिल्हा : 33,317

* जिल्हा बाह्य ः 1078

* एकूण मृत्यू: 2031

* कोरोनमुक्त : 1,10,492