जिल्हयात करोनामुक्तीचे प्रमाण ७८.९० टक्के

२० हजार रूग्णांची करोनावर मात
जिल्हयात करोनामुक्तीचे प्रमाण ७८.९० टक्के

नाशिक । Nashik

नाशिक शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरूच आहे. दररोज सरासरी 500 पेक्षा अधिक रूग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. मात्र असे असले तरी करोनावर मात करणारांची संख्याही वाढत असून सरारी 600 पेक्षा अधिक रूग्ण दररोज करोनावर मात करत आहेत. सोमवार (दि.17) पर्यंत जिल्ह्यातील 19 हजार 951 जणांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यात हे प्रमाण सरासरी 78.90 टक्के इतके आहे.

शहर शहरत, ग्रामिण भाग तसेच करोना नियंत्रणात आलेल्या मालेगाव शहरात नव्याने करोनाचे रूग्ण आढळून येत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढत चालली आहे. करोनाग्रस्त, तसेच जोखमीच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी बेडची संख्या वाढवण्यात येत आहे. तर आता घरीच कोरोंटाईन होऊन घरीच उपचार घेण्यासही परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत असे 2 हजार रूग्ण होमकोरोंटाईन राहून बरे झाले आहेत.

जिल्ह्यात करोनाग्रस्तांची एकुण संख्या 25 हजार 288 झाली आहे. दुसरीकडे दररोज नव्याने दाखल होणार्‍या रूग्णांची संख्याही वाढत आहे. तर जिल्ह्यातील बळींची संख्या 704 झाली आहे. असे असतानाही दिवसेंदिवस करोनावर मात करत पुर्ण बरे होणार्‍या रूग्णांची संख्याही वाढत चालली आहे.

1 ऑगस्ट पासून सरासारी 600 पेक्षा अधिक रूग्ण दररोज बरे होत आहेत. असे आतापर्यंत 19 हजार 951 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. बरे झालेल्यांमध्ये सर्वाधिक नाशिक शहरातील 13 हजार 960 रूग्ण आहेत. शहरात बरे होणारांचे प्रमाण 82.27 टक्के इतके आहे. ग्रामिण भागातील 4 हजार 488, मालेगाव 1 हजार 343 तर 160 जिल्हा बाह्य रूग्ण करोनामुक्तक झाले आहेत. परिणामी प्रत्यक्ष 5 हजार 337 रूग्णच प्रत्यक्ष उरलले आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यातून 1 लाख 1 हजार 604 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील 75 हजार 118 निगेटिव्ह आले आहेत. यातील 4 हजार 633 रूग्ण उपचार घेत आहेत.

असे करोनामुक्त रूग्ण

विभाग संख्या टक्के

* नाशिक 13,960 82.27

* मालेगाव 1,343 65.67

* उर्वरित जिल्हा 4,488 73.74

* जिल्हा बाह्य 160 84.66

* एकूण 19951 78.90

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com