नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 'इतके'

नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 'इतके'

नाशिक | Nashik

करोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा, आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नातून नाशिक विभागात (Nashik Division) रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे.

विभागातून आजपर्यंत 9 लाख 33 हजार 278 रुग्णांपैकी 9 लाख 06 हजार 894 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 7 हजार 374 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आजपर्यंत विभागात 18 हजार 954 रुग्णांचा मृत्यु झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.17 टक्के आहे, तर मृत्युदर 2.03 टक्के इतका आहे. अशी माहिती आरोग्य विभाग (Health Department Nashik) नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली आहे.

नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये 56 लाख 18 हजार 127 अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी 9 लाख 33 हजार 278 अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गंडाळ यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.61 टक्के

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत 4 लाख 02 हजार 824 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 3 लाख 93 हजार 229 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तसेच 1 हजार 72 रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.61 टक्के इतके आहे. आजपर्यंत 8 हजार 523 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 2.11 टक्के आहे .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com