सातपूर | प्रतिनिधी

नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या पत्नीच्या निधनाची बातमी ऐकून व्यथीत झालेल्या पतीने घरात आत्महत्या केल्याची घटना श्रमिकनगर परिसरात घडल्याने नागरीक हळहळ व्यक्त करत आहेत.

श्रमिकनगर येथील माळी कॉलनी येथे राहणार्या संगीता रवींद्र पवार (वय 44) या महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने सोमवार रात्री जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतानाच काल रात्री त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर त्यातच त्यांचे निधन झाले. त्यावेळी रूग्णालयात त्या महिलेसोबत त्यांची दोन्ही मुले होती.

या बाबत ही घटना आज मंगळवारी पहाटे घरी तिच्या मुलाने वडिलांना कळविण्यासाठी मुलाने पुन्हा फोन केला असता वडील फोन का उचलत नव्हते. म्हणून मुलाने शेजारच्यांना फोन करुन वडील फोन उचलत नसल्याचे सांगितले.

शेजारचे घरी आले असता, त्यांना आवाज दिला. पंरतु, आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांनी खिडकीतून डोकावले असता, त्यांना रवींद्र तुळशीराम पवार (वय 52) यांनी पंख्याला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले.

रवींद्र पवार हे सातपूर औद्योगिक वसाहती खासगी कंपनीत कामाला होते. वय जास्त असल्याने ते काही दिवसांपासून घरीच होते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.

पत्नीच्या मृत्यूनंतर काही तासांत नवर्याने जीवन यात्रा संपविल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची प्राथमिक माहिती सातपूर भाजपा मंडल चे अध्यक्ष अमोल इंघे यांनी अशोकनगर पोलीस चौकी येथे जाऊन दिली.

सदर घटनेमुळे सातपूर व नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मनमिळावू दांपत्यांच्या अश्या शेवटामुळे घटना स्थळी अनेकांचे डोळे पाणावले होते.