नाशिक । प्रतिनिधी

शहरात दिवाळी सणांच्या निमित्ताने नाशिककरांनी खरेदीसाठी बाजारपेठेतकेलेल्या गर्दीचे परिणाम आता जाणवू लागले असुन डिसेंबरच्या नऊ दिवसात शहरातील प्रतिदिन सरासरी नवीन करोना रुग्णांचा आकडा 200 च्यावर गेला आहे.

आता गेल्या नऊ दिवसात उपचारार्थ दाखल करोना बाधीतांचा आकडा 615 इतका वाढल्यो बाधीत रुग्णांचा आकडा वाढत चालला असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे नाशिककरांची चिंता वाढविली आहे...

आक्टोंबर महिन्यात नवीन करोना रुग्णांचे सरासरी प्रमाण शंभरच्या आत आल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला होता. नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यापर्यत नवीन रुग्णांचा प्रमाण शंभर ते दीडशेच्या पर्यत आले होते.

दिवाळीच्या मागील - पुढील आठवडा शहरातील सर्वच बाजारपेठा दिवाळीच्या खरेदीसांठी फुलल्याच्या दिसुन आल्या होत्या. मास्कचा वापर न झाल्याने, तसेच सामाजिक अंतराचा विसर पडल्याने करोनाचा संसर्ग वाढल्याचे दिसुन येत आहे. गेल्या दोन आठवड्यातील करोना बाधीताच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

नोव्हेंबरच्या तिसर्या आठवड्यात एकुण रुग्णांचा आकडा लक्षात घेता प्रतिदिन 140 नवीन रुग्ण समोर आले होते. यानंतर चौथ्या आठवड्यात सरासरी रुग्णांचा आकडा 178 पर्यत गेल्यानंतर गेल्या आठवड्यात सरासरी नवीन रुग्णांचा आकडा 218 पर्यत जाऊन पोहचला आहे.

तसेच गेल्या 1 ते 9 डिसेंबर या कालावधीत 1 हजार 860 नवीन करोना रुग्ण समोर आले आहे. तर 30 नोव्हेंबर रोजी शहरात उपचार घेत असलेल्या करोना बाधीतांचा आकडा 1 हजार 429 इतका असतांना तो 9 डिसेंबर रोजी 2 हजार 44 इतका झाला आहे.

अशाप्रकारे महापालिका क्षेत्रात गेल्या नऊ दिवसात अॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा 30 टक्क्यापेक्षा जास्त वाढला आहे. यावरुन आता दिवाळीची गर्दी व तापमानातील घट व वाढीने बदललेले हवामान यामुळे पुन्हा करोना संक्रमण वाढत असल्याचे समोर आहे. यामुळे नाशिककरांची चिंता वाढली आहे.