दिंडोरी पंचायत समितीत करोनाचा शिरकाव

करोना
करोना

ओझे | Oze

दिंडोरी तालुक्यात सध्या करोनाने आपले बस्तान बसवले असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात शिरकाव केला आहे.

आता तर तालुक्याचा आत्मा समजली जाणारी पंचायत समितीत करोनाने शिरकाव केल्यामुळे सर्वञ चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे .

दिंडोरी पंचायत समितीत आरोग्य विभाग, ग्रामपंचायत विभाग, ल.पा.विभाग, इ.विभागात करोना ने शिरकाव केल्यामुळे दिंडोरी पंचायत समिती मधील अनेक अधिकारी वर्गासह कर्मचारी वर्गाचे धाबे दणाणले आहे.

दिंडोरी प.समितीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या कामासाठी तालुक्यातील जनता, लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक आपल्या कामासाठी येत असतात. त्यामुळे संबधित विभागातील अधिकारी व कर्मचारी कुणा कुणाच्या संपर्कात आले असतील. या विषयी सध्या कुणीही बोलण्यास तयार नसून दिंडोरी प. समिती मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामिण भागातून अनेक ग्रामपचायंतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्यासह अनेक लोकांचा प.समितीशी संपर्क येत असल्यामुळे येणा-या जाणा-या लोकांमध्ये भितिचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिंडोरी प.समिती सोमवार,मंगळवार बंद ठेवण्यात येणार असून ज्या विभागामध्ये करोनाने शिरकाव केला आहे त्या ठिकाणी प्रतिबंधक उपाय म्हणून फवारणी केली आहे तसेच सर्व प. समिती अधिकारी व कर्मचारीवर्गाला खबरदारीच्या सूचना दिल्या आहे.

- चंद्रकात भावसार, गटविकास अधिकारी दिंडोरी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com