दिंडोरी शहरातील बँकेत करोनाचा शिरकाव
नाशिक

दिंडोरी शहरातील बँकेत करोनाचा शिरकाव

अन्य दोन पॉझिटिव्ह

Gokul Pawar

Gokul Pawar

दिंडोरी । Dindori

तालुक्यातील खेडगाव येथील करोनाचा संशय असलेल्या एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून, दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे शहरातील एका बँकेतही करोनाने शिरकाव केला असून काही दिवसांकरिता बँक बंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील मोहाडी आणि खेडगाव हे दोन्ही गाव हॉटस्पॉट ठरले आहे. खेडगाव येथे रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. जोपुळ व चिंचखेड येथे काल एक युवक व एक जेष्ठ नागरिक पॉझिटिव्ह आले आहे. खेडगावसह अनेक गावांत प्रशासनाने करोना बाबत जनजागृती केल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांनी सांगितले.

खेडगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे यांनी जागृता दर्शवत आरोग्य सेवेचा आढावा घेतला. खेडगावसह तालुक्यातील आरोग्य केंद्रांना भेटी देत आढावा घेतला. येथील डॉक्टर, कर्मचारी यांनी विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे. शहरातील एचडीएफसी बँकेतही काही दिवसांपूर्वी करोना रुग्ण आढळला होता. परंतु त्यानंतर नाशिक येथून येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अहवाला बाबत माहिती मिळू शकली नाही. सध्या या बँकेतील व्यवहार बंद ठेवण्यात आलेले आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com