जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा ५३ हजार वर

रूग्ण संख्या घटली
जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा ५३ हजार वर

नाशिक । Nashik

नाशिक शहरात तसेच जिल्हात करोनाचा कहर सुरूच असून दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे.

यामुळे जिल्ह्यात करोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येने 53 हजाराचा आकडा पार केला आहे. गेली 24 तासात जिल्ह्यात 1 हजार 187 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 14 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात करोनाबळीचा आकडा 1 हजार 64 झाला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 1 हजार 187 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 747 रूग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 36 हजार 721 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 395 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 13 हजार 375 झाला आहे. मालेगावत दिवसभरात 34 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा 3 हजार 158 झाला आहेे.

जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 262 झाला आहे. तर 24 तासात जिल्ह्यातील 770 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 41 हजार 634 वर पोहचला आहे.

करोनामुळे14 रूग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 5 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. ग्रामिण भागातील 6 व मालेगाव येथील 2 तर जिल्हा बाह्य 1 रुग्णाचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 1 हजार 64 इतका झाला आहे.

याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा वाढत आहे. 24 तासात 1 हजार 140 रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये नाशिक शहरात 925, ग्रामिण व गृह विलगीकरण 124, मालेगाव 38, जिल्हा रूग्णालय 7, डॉ. पवार रूग्णालय 10 रूग्णांचा समाावेश आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 53,516

* नाशिक : 36,721

* मालेगाव : 3,158

* उर्वरित जिल्हा : 13,375

* जिल्हा बाह्य : 262

* एकूण मृत्यू : 1064

* करोनामुक्त : 41,634

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com