सिन्नर | Sinnar

सिन्नर तालुक्यात दिवसेंदिवस करोना बाधितांची संख्या वाढत आहे. यातच विंचूर दळवी येथील करोनाबाधित रुग्णाने...

तालुक्यातील विंचूर दळवी येथे 76 वर्षीय करोना बाधीताने आज (दि.८) पहाटे ५ च्या दरम्यान राहत्या घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

या रुग्णाचा बाधीत असल्याचा अहवाल दोन दिवसांपूर्वीच आला होता. घरातच एका स्वतंत्र खोलीमध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. तेथेच त्यांच्यावर औषधोपचारही चालू होता.

पहाटे साडे पाच च्या दरम्यान त्यांनी गळफास घेतल्याचे उघड झाले. त्यांना रक्तदाब, मधूमेह यासारखा अन्य कुठलाही आजार नव्हता. करोना झाल्याच्या भितीने त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्या मृत्यूमुळे करोनाने मृत्यू झालेल्या तालुक्यातील रुग्णांची संख्या 47 झाली आहे.