करोना रूग्णवाढीने चिंतेत भर

पालिकेत धर्मगुरूंची बैठक; उपाययोजनांवर चर्चा
करोना रूग्णवाढीने चिंतेत भर

मनमाड । प्रतिनिधी Manmad

पहिल्या व दुसर्‍या लाटेप्रमाणे करोनाच्या (corona) तिसर्‍या लाटेने (third wave) शहर-परिसरासह नांदगाव तालुक्यात (Nandgaon taluka) पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून बधितांचा आकडा 170 पर्यंत गेला आहे.

दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. करोना आटोक्यात आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना (Measures) केल्या जात असल्याची माहिती मुख्याधिकारी विजयकुमार मुंढे (Chief Officer Vijay Kumar Mundhe) यांनी दिली. सुदैवाने सध्या परिस्थिती आटोक्यात असून एकाही रुग्णाला दाखल करण्याची वेळ आलेली नाही.

परिस्थिती गंभीर झाल्यास आरोग्य विभाग (Department of Health) सतर्क असून पुरेसे बेडस् (beds) व ऑक्सीजनची (Oxygen) व्यवस्था करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जगताप (Medical Officer Dr. Jagtap), उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरवणे (Medical Superintendent of Sub-District Hospital Dr. Narvane) यांनी दिली. मनमाड शहर (Manmad City), परिसरात पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत करोनाने कहर केला होता. त्यावेळी सुमारे अडीच हजारापेक्षा जास्त नागरीक करोनाच्या विळख्यात सापडले होते.

त्यापैकी अनेकांनी करोनावर मात केली तर 83 हून अधिक रुग्णांचा करोनाने बळी घेतला. त्यानंतर करोना आटोक्यात आल्याचे पाहून सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलेला असतांना तिसर्‍या लाटेच्या रूपाने करोनाची पुन्हा एन्ट्री होऊन 3 जानेवारीला नवा रुग्ण आढळून आला. त्यानंतर करोना (corona) वेगाने वाढू लागला असून सद्यस्थितीत शहरात सूमारे 100 तर ग्रामीण भागात 70 रुग्ण आहेत.

करोनाचे पुनरागमन झाल्याचे पाहून पालिका प्रशासन, आरोग्य विभाग (Department of Health) व पोलीस यंत्रणा (Police system) सतर्क झाली असून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. आ. सुहास कांदे (mla suhas kande) यांच्या प्रयत्नातून उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांट (Oxygen Generation Plant) सुरू झालेला आहे. त्यातून दररोज मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होत आहे.

उपजिल्हा रुग्णालयात 30 बेडची व्यवस्था करण्यात आली असून लसीकरणावर देखील भर दिला जात आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमावलीची पालिका प्रशासन कडक अंमलबजावणी करीत आहे. शुक्रवारी शहरातील सर्व मशीदींमधील मौलाना, सर्वधर्मीय धर्मगुरू यांची पालिकेत बैठक घेण्यात आली. त्यात लसीकरणाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच लसीकरणासाठी शिबीरे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी मुख्याधिकारी मुंढे, मौलाना हाजी उस्मान, मौलाना अस्लम रिजवी, हाफिज रेहान, हाजी मकसूद, सुलेमान रजा कादरी, फिरोज शेख, अख्तर शेख, रईस फिटर, शेख अक्रम वसीम, इकबाल सय्यद, चिराग सय्यद, पालिकेचे अजहर शेख, पोलीस गोपनीय विभागाचे सुनील पवार आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com