करोनाची दहशत; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यु

करोनाची दहशत; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यु

सिन्नर । Sinnar (प्रतिनिधी)

सिन्नर तालु्नयात करोना संसर्गाने अक्षरश: थैमान घातले असून एकीकडे रुग्णांना बेड मिळत नाही तर दुसरीकडे मृत्युचे तांडव सुरू झाले आहे.

तालु्नयातील उज्जनी येथे आठवडाभरात एकाच कुटुंबातील वडील, मुलगा, पत्नी आणि आई अशा चौघांचा कारोनाने मृत्यु झाला असून गावातील काही अत्यवस्थ रुग्णांना बेड मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली आली आहे.

सिन्नर शहरासह ग्रामीण भागात करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. पटकन निदान होऊन योग्य उपचार न मिळाल्यास कारोना कीती भयंकर आहे याची प्रचिती तालु्नयातील उज्जनी या गावात बघावयास मिळाली.

येथील एका कुटुंबातील पती-पत्नी चारपाच दिवसांपासून आजारी होते. मात्र नेहमीप्रमाणे वातावरणातील बदल किंवा पाणी बदलामुळे ताप, सर्दी झाली असावी असे गृहीत धरून दोघेही पतीपत्नी वावी येथील एका खासगी दवाखान्यात उपचार घेत होते.

अशातच गत गुरूवारी (दि. 8) घरातील 87 वर्षीय वृद्ध वडिलांचा अचानक मृत्यु झाला. त्यामुळे आपल्यामुळे वडिलांना संसर्ग झाला असावा अशी शंका आल्याने दोघा पती-पत्नी यांनी तत्काळ सिन्नर गाठत कारोना टेस्ट करून घेतली. त्याच दोघेही पॉझिटीव्ह आले.

त्यामुळे त्यांना तत्काळ सिन्नर ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान प्रकृती गंभीर असल्याने दोघांनाही त्याच दिवशी एसएमबीटी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र दुसर्‍याच दिवशी (शुक्रवारी) पतीचा मृत्यु झाला.

पतीची चिता विझते ना तोच दुसर्‍या दिवशी (शनिवारी) पत्नीचाही उपचारादरम्यान मृत्यु झाला. त्यामुळे या कुटुंबावर मोठी शोककळा पसरली. त्यानंतर आज (दि. 15) होम कॉरंटाईन असलेल्या 85 वर्षीय आईचा देखील मृत्यु झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

गावात याच दरम्यान आनखी एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यु झाला असून काही अत्यवस्थ कोरोना रुग्णांना दोन दिवसांपासून सिन्नर, एसएमबीटी रुग्णालय तसेच नाशिक आणि संगमनेर येथे बेड मिळत नसल्याचा गंभीर प्रकार येथील उपसरपंच बाळासाहेब सापनर यांनी सांगितला.

काही तासांच्या अंतराने पती-पत्नीने जगाचा निरोप घेतला. तर एकाच कुटुंबातील तिघांच्या आकस्मिक जाण्याने या परिवारावर शोककळा पसरली आहे. याच कुटूंबातील अजून तीघे तर गावातील दहाबारा रुग्णांना कोरोनाची लागन झाली असून यांना आरोग्य विभागाकडून तातडीने योग्य उपचार मिळावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com