नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात करोनाचा आकडा वाढता वाढता वाढत आहे. आज आलेल्या आकडेवारीनुसार नाशिक जिल्ह्यात २२९ रुग्ण करोनाबाधित आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण नाशिक महापालिका क्षेत्रातील असून शहरातील नागरिकांसाठी धोक्याची घंटा आहे...

अजूनही नागरिक गर्दीच्या ठिकाणी जात आहेत. अनेकांच्या तोंडाला मास्क दिसून येत नाही. सामाजिक अंतराने भान येथील नागरीक पाळताना दिसून येत नाही. त्यामुळे रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये आज १९३ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर नाशिक ग्रामीण भागात आज ५७ रुग्णांची भर पडली. दुसरीकडे आज मालेगाव मनपा क्षेत्रातदेखील आज १० रुग्ण वाढले आहेत. तर जिल्हाबाह्य ११ रुग्णांचा समावेश आजच्या आकडेवारीत आहे.

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज संपूर्ण जिल्ह्यात एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.