नाशिक जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा ७५ हजार वर

एकाच दिवसांत २२ रूग्णांचा मृत्यू , ग्रामीण भागात वाढतोय धोका
नाशिक जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा ७५ हजार वर

नाशिक | प्रतिनिधी

जिल्ह्यात मागील चोवीस तासात १ हजार २४३ रूग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा ७५ हजार ८७६ वर पोहचला आहे. तर सलग दुसर्‍या दिवशी जिल्ह्यात २२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ग्रामिण भागातील सर्वाधिक १६ रूग्ण आहेत. तसेच पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये ग्रामिण भागाने आघाडी घेतली आहे. यामुळे करोनाचा धोका आता ग्रामिण भाागात वाढत चालल्याचे चित्र आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : ७५,८७६

* नाशिक : ५१,४७२

* मालेगाव : ३,७३६

* उर्वरित जिल्हा : २०,१७०

* जिल्हा बाह्य ः ४९८

* एकूण मृत्यू: १३७०

* करोनामुक्त : ६६,३९१

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार मागील २४ तासात १ हजार २४३ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक ४४४ रूग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा ५१ हजार ४७२ वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील ७७२ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा २० हजार १७० झाला आहे. मालेगावत दिवसभरात १६ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा ३ हजार ७३६ झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा ४९८ झाला आहे.

दुसरीकडे करोनावर मात करणार्‍या रूग्णांमध्येही दिवसेंदिवसे वाढ होत आहे. २४ तासात जिल्ह्यातील ७५६ रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा ६६ हजार ३९१ वर पोहचला आहे.

करोनामुळे आज २२ रूग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये ०४ रूग्ण नाशिक शहरातील आहेत. सर्वाधिक ग्रामिण भागातील १६ तर मालेगावच्या २ रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा १ हजार ३७० इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा वाढत आहे. २४ तासात २ हजार ७६ रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये नाशिक शहरात १ हजार८९०, ग्रामिण व गृह विलगीकरण १४८, मालेगाव २४, जिल्हा रूग्णालय ६, डॉ. पवार रूग्णालय ८ रूग्णांचा समाावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com