जिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच; आज ५५ बळी

आज ५ हजार ९२८ पाॅझिटिव्ह
जिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच; आज ५५ बळी

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहर व जिल्ह्यात करोनाचा कहर सुरुच असून गुरुवारी (दि.२२) ५५ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला. तर दिवसभरात ५ हजार ९२८ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले.

नाशिक शहर व जिल्हा करोनाचा हाॅटस्पाॅट ठरत असून दुसर्‍या लाटेने कहर माजवला आहे. गुरुवारी नाशिक महापालिका हद्दित सर्वाधिक ३ हजार ३७५ करोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले.

त्या खालोखाल नाशिक ग्रामीणमध्ये २ हजार २७४, मालेगाव मनपा हद्दित १९‍१ व जिल्हाबाह्य ८८ रुग्णांना करोनाची बाधा झाली. थोडिफार दिलासादायक बाब म्हणजे ३ हजार ५७५ रुग्णांनी करोनावर मात केली.

आज करोनाने झालेले मृत्यू-

नाशिक मनपा - ११

मालेगाव - १

नाशिक ग्रामीण - ४२

जिल्हाबाह्य - १

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com