वैद्यकीय कचरा
वैद्यकीय कचरा
नाशिक

करोना वेस्टचा प्रश्न गंभीर

मास्कसह साहित्य इतस्त पडल्याने संसर्गाचा धोका अधिक

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्याच्यापासून बचावासाठी वापरल्या जाणार्‍या साहित्याच्या कचर्‍याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस करोना वेस्ट वाढत चालले आहे. यावर तातडीने उपायोजना न झाल्यास करोना प्रसाराचा धोका अधिक वाढणार आहे.

मागील चार महिन्यांपासून संपुर्ण जग करोनाशी लढत आहे. आतापर्यंत यावर लस उपलब्ध नव्हती यामुळे सर्वत्र करोनापासून बचाव करण्याची साधने वापरण्यावर भर होता. यामध्ये सॅनिटायझर, मास्क, हॅण्ड ग्लोज, पीपीई किटस, फेस सिल्ड यांचा वापर करण्यात येत आहे. आता घरोघरी सॅनिटायझर वापरले जात आहे. याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच वाढत चालला आहे.

करोना रूग्णालयांसह सर्व शासकीय रूग्णालये तसेच खासगी रूग्णालयांमध्ये डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी पीपीई किट वापरत आहेत. हे किट एकच दिवस वापरता येत आहेत. एकादा वापरल्यानंतर पुन्हा हे किट वापरता येत नसल्याने ते फेकून द्यावे लागत आहेत. अशा प्रकारे दररोज प्रत्येक रूग्णालयातून तसेच शासकीय रूग्णालयांतून हजारोच्या घरात पीपीई किट फेकुन दिले जात आहेत. याबरोबरच वापरे जाणारे हॅण्ड ग्लोज, कॅप, फेससिल्ड हे सर्व फेकून देण्यात येत आहे. हे सर्व इतर मेडिकल वेस्टसोबत एकत्र करून नष्ट केले जात आहे. परंतु ही पद्धत योग्य असल्याबाबत कोणताही खात्रीशिरपणा नाही.

करोनामुळे प्रत्येक नागरीकाला मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. अन्यथा पोलीसांकडून कारवाई केली जात आहे. अनेक नागरीक कापडी मास्क वापरत आहेत. ज्याचा धुऊन वापर केला जात आहे. परंतु अनेक वापरा आणि फेकुण द्या अशा स्वरूपाचे मास्क आहेत. जे एकाच दिवसात फेकुन द्यावे लागत आहेत. तर काही मास्क 8 ते 15 दिवसात फेकुन द्यावे लागत आहेत.

सध्या अनेक सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, कचर्‍याचे ढिकारे यामध्ये वापरून फेकलेले मास्क तसेच हॅण्ड ग्लोज आढळून येत आहेत. करोनाचा प्रसार होऊ नये म्हणुन वापरण्यात येणारे मास्क अशा प्रकारे उघड्यावर टाकून दिल्याने या मास्कमुळेच करोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता आधिक मानली जात आहे. इतर नागरीक हे मास्क कचरा पेटी व त्यातून घंटागाडीत टाकत आहेत. परंतु यातून घंटागाडीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना याचा धोका आहे. यामुळे याची वाहतुक करण्याबाबत निश्चित धोरण असणे गरजेचे असल्याचे तज्ञांचे मत आहे.

योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक

करोनापासून बचावासाठी रूग्णालयांमध्ये वापरण्यात येणारे साहित्य हे मेडिकल वेस्टसोबत योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली जाते. मात्र नागरीकांनी घरी वापरलेले मास्क तसेच इतर साहित्य कचर्‍यामध्ये न फेकता ते स्वतंत्रपणे एकत्र करावे, शक्य असल्यास ते जाळुन टाकणे योग्य होईल. तसेच हे साहित्य गोळा करण्याबाबत पालिकेने, ग्रामपंचायतींनी नियोजन करणेही आवश्यक आहे.

- डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक

Deshdoot
www.deshdoot.com