ग्रामीण भागात करोना पसरतोय हातपाय

जिल्ह्यात दिवसभरात 188 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह
ग्रामीण भागात करोना पसरतोय हातपाय
करोना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह रूग्ण ( Corona Positive Patients ) तसेच मृत्यु संख्येमध्येही चढ उतार होत असल्याचे चित्र आहे. प्रामुख्याने ग्रामिण भागात ( Rural Areas ) करोना हळुहळु हातपाय पसरत असून सर्वांनी करोनाचे नियम पाळुन काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान मागील चोवीस तासात 188 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात शनिवारच्या तुलनेत 54 ने वाढ आहे. तर मृत्यु संख्या 7 वर गेली आहे.

दिवसभरात 111 रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे आतापर्यंत 3 लाख 86 हजार 3 जणांनी कोरोनावर मात केली आहे. हे प्रमाण 97.43 टक्कें पेक्षा अधिक आहे. तर आज जिल्ह्यात 7 मृत्यु झाले आहेत.

नाशिक शहरात करोना आटोक्यात आला असला तरी दररोज बाजारपेठेत होणारी गर्दी तसेच करोना नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे शहराबरोबरच ग्रामिण भागातही रूग्ण संख्येत चढउतार दिसत आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 188 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील संख्या 79 इतकी आहे. आज ग्रामिण भागात 97 रूग्ण आढळले. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील करोना रूग्णांचा आकडा 3 लाख 96 हजार 353 इतका झाला आहे. तर दिवसभरातील 7 मृत्यु झाले आहेत. शनिवारपेक्षा यात 3 ने वाढ आहे. यात 5 ग्रामिण भागातील रुग्ण आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 3,96,353

* नाशिक : 2,27,379

* मालेगाव : 12,563

* उर्वरित जिल्हा : 1,50,931

* जिल्हा बाह्य ः 5,480

* एकूण मृत्यू: 8,431

* करोनामुक्त : 3,86,114

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com