सौंदाणेत करोनाचा शिरकाव
नाशिक

सौंदाणेत करोनाचा शिरकाव

पाच दिवस कडकडीत बंद

Abhay Puntambekar

उमराणे । वार्ताहर Umrane

गेल्या चार महिन्यांपासून मालेगाव जवळ असल्याने सौंदाणे गावात करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ग्रामपंचायत, सोसायटीसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. मात्र आज दोन बाधित रुग्ण आढळून आल्याने गावासह परिसरात चिंतेचे सावट पसरले आहे.

संक्रमण रोखण्यासाठी आज सकाळी ग्रा. पं. सदस्य, सर्वपक्षीय कार्यकर्ते व व्यापारी यांची बैठक होऊन साखळी तोडण्यासाठी संपूर्ण गाव मेडिकल व दवाखाना सोडून पुढील पाच दिवस २१ जुलैपर्यंत कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सरपंच डॉ. मिलिंद पवार यांनी दिली.

नियम न पाळणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. दरम्यान, आज महावीर भवन परिसर, स्वामी समर्थ मंदिर परिसर सील करण्यात आला असून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील १४-१५ जणांना मालेगाव येथे क्वारंटाईन करण्यासाठी नेण्यात आल्याची माहिती आरोग्य सूत्रांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com