नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यास करोनाचा फटका

दोन वर्षात २० लाखांच्या महसूलावर पाणीे
नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यास करोनाचा फटका

नाशिक | Nashik

सलग दोन वर्षापासून करोनाचा प्रभाव (Corona Impact) राज्यात असल्याने याचा फटका धार्मिक स्थळांसह पर्यटन क्षेत्राला (Tourism Department) बसला आहे.

नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यास Nandurmadhyameshwer Bird Sanctuary) देखील या महामारीचा फटका (Corona Crisis) बसला आहे. नांदूरमध्यमेश्‍वर या स्थळास राज्यासह देशभरातील पक्षीप्रेमी (Birds Lovers), पर्यावरणप्रेमी (Nature Lover) भेटी देत असतात. २०२० ते २१ दरम्यान नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्य बंद असल्याने वन्यजिव विभागाच्या (Wildlife Department) महसूलावर परिणाम (Impact On Revenue) झाला आहे.

करोनामुळे दोन वर्षात २० लाखाहून अधिक महसूलावर पाणी फिरले आहे.

महाराष्ट्रातील भरतपूर (Maharashtras Bharatpur) अशी ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यात दरवर्षी २६५ विविध जाती प्रजातीचे देशी व विदेशी पक्षी (Native and exotic birds) दाखल होतात.

या पक्षांना पाहण्यासाठी राज्य व भारतातून पर्यट्क येथे येतात. यातुन स्थानिकांना रोजगार (Employment to locals) मिळतो. वर्षभरात पंधरा हजारहून अधिक पर्यट्क (Tourist) याठिकाणी भेटी देतात, या भेटीतून वन्यजिव विभागाकडे चांगला महसूल जमा होत असल्याने त्यातून या अभयारण्यात विविध कामे केली जातात. मागील वर्षापासून करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्य बंद ठेवण्यात आले होते.

दरम्यान दि.७ जुन पासून नाशिक प्रादेशिक वनवृत्तातील (Nashik Regional Forest Circle) सहा अभयारण्य खुले करण्यात आले. यात नांदूरमध्यमेश्‍वर हे पक्षी अभयारण्य देखील पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. मात्र केरोनामुळे पर्यटक येण्यास धजावत आहे.

पर्यटकांच्या गर्दीवर परिणाम झाल्याने महसूलाला याचा फटका बसल्याचे वन्यजिव विभागाच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे. पुढील काही दिवसात परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा वन्यजिव विभागाला आहे. साधारण ऑक्टोंबर पासून विदेशातील पक्षी येथे दाखल होण्यास सुरवात होते.

पुढे मार्च ते एप्रिल पर्यत या पक्ष्यांचा याच ठिकाणी मुक्काम असतो. नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यास रामसरचा दर्जा मिळाल्याने राज्यात या ठिकाणाचे जैवविविधतेच्या दृष्टीने महत्व अधिकच वाढले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com