करोनाचा उद्रेक! जिल्ह्यात एकाच दिवसात रुग्णांचा आकडा पाचशे पार

करोनाचा उद्रेक! जिल्ह्यात एकाच दिवसात रुग्णांचा आकडा पाचशे पार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात करोनाचा उद्रेक दिसून येत आहे. जिल्ह्यात दिवसभरात ५०८ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह (corona reports positive) आले आहेत. तर ८८ रूग्णांनी करोनावर मात केली...

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात ५०८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरात (Nashik City) ४१३, नाशिक ग्रामीण (Nashik Rural) विभागात ७७, मालेगाव (Malegaon) ०२ तर जिल्हाबाह्य १६ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज ०२ करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. हे दोन्ही रुग्ण नाशिक ग्रामीण भागातील आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ७६१ इतकी आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com