छगन भुजबळ
छगन भुजबळ
नाशिक

करोनाचे संकट सर्वांसाठी स्वावलंबी आणि सशक्त बनण्याची संधी

पालकमंत्री छगन भुजबळ

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक | Nashik

करोनाच्या संकट काळात शासन, प्रशासन आणि नागरिकांचा पुढाकार कौतुकास पात्र आहे. त्यामुळेच कोरोनाचा संकट काळ हा आपणा सर्वांसाठी स्वावलंबी व सशक्त बनण्याची संधी आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतंत्र दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनाचे ध्वजारोहण पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडला त्यावेळी ते बोलत होते.

आज सर्व भारतीयांच्या उत्साहावर करोनाचे सावट आहे. त्यातुन आपला महाराष्ट्र, आपला जिल्हाही या आपत्तीच्या सावटाखाली आहे. संकट भले कितीही मोठे असो आपण सर्वजण जात, धर्म, प्रांत, लिंगभेद विसरून त्याचा एक दिलाने सामना करु. तसेच देशाला ब्रिटीशांच्या तावडीतून मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून देण्याचा चंग आपल्या क्रांतीकारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी बांधला होता तसाच संकल्प आज देशाला, राज्याला, जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी आपण आजच्या स्वातंत्र्य दिनी करुया असे आवाहन, राज्याचे अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर बनले लोकचळवळ

जिल्ह्यात करोना संकटाची परिस्थिती लक्षात घेवून जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरण व जिल्हा प्रशासना मार्फत इमर्जंन्सी ऑपरेशन सेंटरची स्थापना करण्यात आली होती. गेल्या पाच महिन्यात या इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरने केवळ सर्व प्रशासकीय यंत्रणेलाच नाही तर जिल्ह्यातील अनेक सेवाभावी संस्था, सामाजसेवक, उद्योग, धार्मिक संस्था यांना एका सांध्यात जोडून आपत्ती निवारणाच्या कामाला लोकाभिमुख चेहरा प्राप्त करून दिला आहे.

इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरच्या माध्यमातून शासकीय व प्रशासकीय मदतीचा प्रवाह एक लोक चळवळ बनला असल्याचे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

‘ई स्काय व ई साय क्लिनिक’ चे लोकार्पण

करोना साथरोग काळामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पॉझिटिव्ह व गंभीर रुग्णांवर क्लाऊड फिजिशियनद्वारे रुग्णांचे मॉनेटरिंग करून ‘ई स्काय क्लिनिक’ चे लोकार्पण करण्यात आले.

करोना काळात नागरिकांची व रुग्णांची मानसिकता सकारात्मक राहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ‘ई साय क्लिनीक’द्वारे समुपदेशन करण्याचा उपक्रमाचा शुभारंभदेखील पालकमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com