जिल्हा परिषद मुख्यालयातही करोनाचा शिरकाव

सेवकांमध्ये भितीचे वातावरण
जिल्हा परिषद मुख्यालयातही करोनाचा शिरकाव

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना रूग्णसंख्येत corona patients दिसागणिक वाढ होत चालली  असून आता शासकीय कार्यालयामध्ये त्याचा शिरकाव झाला आहे. जिल्हा परिषदेतील Zilla Parishad Nashik बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांसह एका अधिकाऱ्याचे कुटुंबिय तसेच सेवकास करोनाची बाधा झाली आहे.यामुळे जिल्हा परिषद सेवकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, सेवकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषदेत निर्बंध वाढवावे,अशी मागणी सेवक संघटनांनी केली आहे.

राज्यात करोना बाधीतांची संख्या वाढत आहे.विविध राजकीय पक्षांचे नेते, तसेच १५ हून अधिक मंत्री, ७० आमदार यांना करोनाची लागण झालेली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार, खासदार हेमंत गोडसे यांना देखील करोनाचा बाधा झाली आहे. तीन दिवसात रूग्णसंख्येत तिपटीने वाढ झाली आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, कोरोना पुन्हा शासकीय कार्यालयांमध्ये प्रवेश केला आहे.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता करोना पॉझिटीव्ह सापडल्या आहेत. एका विभाग प्रमुखाचे संपूर्ण कुंटुंबीयच करोना बाधीत झाले आहे. याशिवाय दोन सेवकांनाही करोना झाल्याचे निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे सेवकांमध्ये करोनाची धास्ती वाढली आहे. करोनाचे निर्बंध वाढले असले तरी, शासकीय कार्यालयामध्ये निर्बंंध लागू झालेले नाही. त्यामुळे कार्यालयामध्ये गर्दी सुरूच आहे.

जिल्हा परिषदेत कामांची शिफारशी घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. याशिवाय निधी प्राप्त होत असल्याने कार्यारंभ आदेश घेण्यासाठी हळूहळू गर्दी होऊ लागली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसहिंता लागण्याची शक्यता लक्षात घेऊन सदस्यांची कामे करून घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. त्यामुळे सर्वच कार्यालयांमध्ये गर्दी दिसत आहे. यात जिल्हा परिषदेत येणाºयांची तपासणी देखील बंद आहे. जिल्हा परिषदेत येणाºयांची मोठी गर्दी असल्याने गर्दी कमी करण्यासाठी निर्बंंध घालण्यात यावे, अशी मागणी कर्मचारी वर्गाकडून सुरू झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com