
पिंपळगाव बसवंत | प्रतिनिधी | Pimpalgaon Baswant
पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथून जवळच असलेल्या उंबरखेड (Umbarkhed) येथील शेतकरी राजेंद्र निरघुडे (Rajendra Nirghude) यांच्या एक एकर कोथिंबीरला जागेवर दोन लाखाचा भाव मिळाल्याने त्यांना मोठा नफा झाला आहे...
राजेंद्र निरघुडे यांची पाच एकर शेती (Agriculture) असून ते टोमॅटो व कांदा आडतदार आहेत. राजेंद्र निरघुडे यांची द्राक्ष बाग (Vineyard) देखील आहे. पंरतु, ते द्राक्षाचे पीक न घेता नगदी पिके घेण्यात अग्रेसर आहेत. मराठी महिन्याच्या अंदाजानुसार दरवर्षी आखाड महिन्यात निरघुडे मेथी, कोथिंबीर ही पिके घेत असतात.
तसेच निरघुडे यांनी शेतात शेपु, मेथी, कोथिंबीर ही पिके घेतली असून दोन एकरवर लावलेली कोथिंबीर काढणीला आली आहे. त्यातील एक एकर कोथिंबीर (Coriander) ही त्यांनी बाजार समितीत न नेता जागेवरच दोन लाखाला दिली.
तर पावसाचे (Rain) दिवस असल्याने कधी कोथिंबीरचे नुकसान होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे मजुरी, वेळ व चांगला भाव लक्षात घेता ती जागेवरच विकल्याचे राजेंद्र निरघुडे यांनी सांगितले. तसेच निरघुडे यांची ही कोथिंबीर एकता ग्रुपचे संचालक व व्यापारी भिमा शिंदे, उत्तम गडाख, रामेश्वर शिंदे, समाधान पवार, यांच्यासह आदी व्यापाऱ्यांनी (Merchant) खरेदी केली.
सध्या पावसाने कोथिंबीरचे नुकसान झाले असून मागणी वाढली आहे. तसेच बाजार समितीत खरेदी केलेला माल हा पोहचण्यास उशीर होतो व नुकसान देखील होते. त्यामुळे शेतातील कोथिंबीर ही थेट पाठवतो. यामुळे वेळेची बचत होते आणि माल देखील चांगला राहतो.
भिमा शिंदे, व्यापारी
गेल्या अनेक वर्षापासून आम्ही शेतात नगदी पिके घेणे पसंत करत आहोत. त्यापैकी कोथिंबीर हे पिक ५५ ते ६० दिवसात येते. तसेच दरवर्षी आम्हाला निसर्गाने साथ दिल्यास चांगले पैसे मिळतात.
कैलास निरघुडे, शेतकरी, उंबरखेड