कोथिंबिरीला वीस हजार रुपये विक्रमी भाव

कोथिंबिरीला वीस हजार रुपये विक्रमी भाव

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) मुख्य बाजार आवारात सोमवारी (दि.२६) सायंकाळच्या लिलावात कोथिंबिरीला (Coriander) वीस हजार पाचशे रुपये इतका विक्रमी भाव मिळाला...

कृषी उपन्न बाजार समितीत नाशिक तालुक्यातील म्हसरूळ मखमलाबाद, दरी, मातोरी, मुंगसरा, गिरणारे, गोवर्धन, दूगाव, धोंडेगाव, सिन्नर, निफाड, दिंडोरी, पेठ, त्रंबकेश्वर तसेच पुण्यातील खेड, मंचर आदी भागातून पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात होते.

कोथिंबिरीला वीस हजार रुपये विक्रमी भाव
Navratrotsav 2022 : नाशिकमधील 'या' दहा देवींचे दर्शन घ्या एका क्लिकवर...

सोमवारी (दि.२६) सायंकाळी पालेभाज्यांचे लिलाव झाले. साईधन कंपनीत पालेभाज्या घेऊन आलेल्या दिंडोरी तालुक्यातील नवळपाडा गावातील शेतकरी विनायक लक्ष्मण वाघीरे हे चायना कोथिंबीर घेऊन आले होते.

त्यांच्या कोथिंबीरिस वीस हजार पाचशे रुपये शेकडा बाजार भाव मिळाला. सदर कोथिंबीर नितीन लासुरे या व्यापाऱ्याने घेतली असून मुंबई, गुजरात, सुरत येथील मार्केटला पाठविणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com