शेतीसाठी समन्वय महत्वाचा

द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांचे प्रतिपादन
शेतीसाठी समन्वय महत्वाचा

खडकमाळेगाव । वार्ताहर Khadak Malegaon-Niphad

सध्या द्राक्ष शेती (Grape farming) शास्वत राहिली नसल्याने उत्पादक व द्राक्षबागायतदार संघ (Grape Growers Association) यांचा समन्वय असणे गरजेचे आहे. तसेच द्राक्ष उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.

संघाच्या माध्यमातून व नविन तंत्रज्ञानाचा (New technology) अवलंब करून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी विशेष लक्ष देवून आगामी द्राक्ष हंगामात (grape season) तयार झालेला द्राक्षमाल वातानुकूलित सुविधा (Vineyard air-conditioned facility) असलेल्या रेल्वेद्वारे बांगला, दिल्ली आदी बाजारपेठेत पाठविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

साहजिक त्यामुळे शेतकर्‍यांना चांगला बाजारभाव मिळून आर्थिक लाभ होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले (Kailash Bhosale, vice president of the Grape Growers Association) यांनी केले आहे.

राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खडकमाळेगाव येथे भोसले यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी प्रगतिशील द्राक्ष उत्पादक शेतकरी (Grape growers) नामदेवराव रायते होते. सत्काराला उत्तर देतांना भोसले म्हणाले की, द्राक्ष उत्पादकांच्या सोयीसाठी लासलगाव (Lasalgaon) येथे डेपो सुरू करण्यात येईल.

तसेच द्राक्षाच्या पेटेंट फ्री व्हरायटीचे (Patent free variety) महत्व तसेच कमी कालावधीत व कमी खर्चात शेतकर्‍यांनी लागवडीचा विचार करावा. संघाच्या माध्यमातून आधुनिक शेती प्रयोगशाळा (Modern agricultural laboratory), पाणदेठ, निरीक्षण, पाणी व माती परिक्षण (Water and soil testing), काडीवरील डोळे तपासणी यांचीही माहिती दिली. यावेळी राज्य संघाचे संचालक रावसाहेब रायते, विभागीय संचालक अ‍ॅड. रामनाथ शिंदे, नंदू पानगव्हाणे, योगेश कुशारे, दिनेश रकिबे यांचाही ग्रामपंचायत, सहकारी सोसायटी व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी लासलगाव बाजार समिती मा. संचालक दत्ता रायते, सोसायटी चेअरमन सुरेश रायते यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी सरपंच बाळासाहेब रायते, उपसरपंच नारायण राजोळे, सदस्य विठ्ठल कान्हे, अनिल शिंदे, पंढरीनाथ रायते, मोतीराम रायते, दशरथ सुडके, गजानन रायते, धोंडीराम रायते, शरद राजोळे, राजेंद्र शिंदे, माधव रायते, दौलत रायते, राजेंद्र रायते, शिवराम रायते, बबन रायते उपस्थित होते. निवृत्ती रायते यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Stories

No stories found.