विकासासाठी सरपंच, ग्रामसेवकांमध्ये समन्वय हवा

सरपंच परिषदेत माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांचे प्रतिपादन
विकासासाठी सरपंच, ग्रामसेवकांमध्ये समन्वय हवा

सटाणा । प्रतिनिधी Satana

गावपातळीवर सर्वांगीण विकास (Development) घडविण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांमध्ये (Sarpanch and Gramsevak) समन्वय आवश्यक असल्याचे मत माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख (Former Chartered Officer Inderjit Deshmukh) यांनी व्यक्त केले.

येथील आश्रय फाऊंडेशन (Ashray Foundation) व ग्रामसंघ यांच्या वतीने सप्तपदी लॉन्समध्ये आयोजित सरपंच परिषदेत बोलतांना देशमुख यांनी यांनी सरपंच व ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे दोन चाके असल्याचे सांगितले. गावाचा विकास करतांना सरपंचाला गावातील मुलभूत गरजा ग्रामस्थांकडून समजावून घ्याव्या लागतात. त्या समस्या सदस्यांच्या बैठकीत मांडून त्याचा पाठपुरावा ग्रामसेवकाला करावा लागतो.

त्यासाठी निधीची तरतूद व शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकाला संयुक्तिकरित्या पाठपुरावा करून त्यातुन गाव विकास साधावा लागतो. यासाठी ग्रामसभा महत्व पूर्ण असल्याचे देशमुख यांनी सांगितले.यावेळी राज्यातील पाटोदा गावचे माजी सरपंच भास्कर पेरे-पाटील यांनी बोलतांना सरपंचांनी विकासकामांबाबत तक्रार करणार्‍यापेक्षा मतदान करणार्‍या गावकर्‍यांकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.

पुणे जिल्हा परिषदेचे सभापती शरद बुट्टे (Zilla Parishad Speaker Sharad Butte) यांनी शासनाच्या विविध योजनांचा अभ्यास करून त्यांचा लाभ आपल्या गावासाठी कसा करून घेता येईल या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात अध्यक्ष आ. दिलीप बोरसे, नगराध्यक्ष सुनिल मोरे आदींची भाषणे झाली. सरपंच परिषेदेत तालुक्यातील ग्रामपंचायत खालचे टेंभे, नामपुर, गोळवाड, नवे निरपुर, डांगसौंदाणे, आराई, लखमापुर, चौंधाणे, अंतापूर, दहींदुले, तांदुळवाडी, काकडगांव, रामतीर, नळकस या ग्रामपंचायतींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट ग्रामसंसद पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

यावेळी जि.प. सदस्य यतीन पगार, गणेश आहिरे, रेखा पवार, मीना मोरे, साधना गवळी, सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील, पं.स. उपसभापती ज्योती आहिरे, पोपट आहिरे, केदा काकुळते, भाऊसाहेब आहिरे, कान्हु आहिरे, लालचंद सोनवणे, संदीप पवार, किशोर भांगडीया, मालेगावच्या माजी उपमहापौर ज्योती भोसले आदी उपस्थित होते.

आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. वैभव गांगुर्डे यांनी प्रास्ताविक करतांना गावाच्या विकासात शहर, राज्य व देशाचा विकास होत असल्याचे सांगितले. आभार ग्रामसंघाचे अध्यक्ष नंदकीशोर शेवाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय गोसावी, योगेश भामरे, यशवंत धोंडगे, पंकज पवार, मुन्ना धिवरे, पंकज सोनवणे, सागर भामरे, प्रफुल्ल कुवर, गौरव शिंदे, विकी कापडणीस, निखील जाधव, योगेश वणीस, दत्तू पवार यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com