उद्योग प्रकल्प उभारणीस सहकार्य : ना. देसाई

एमआयडीसी अंतर्गत रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचे निर्देश
उद्योग प्रकल्प उभारणीस सहकार्य : ना. देसाई

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

तालुक्यातील अजंग-रावळगाव औद्योगिक वसाहतीला (Ajang-Rawalgaon Industrial Estate) लागून असलेल्या 2.7 कि.मी. रस्त्याच्या कामास मान्यता देण्यासह उद्योग नियमावलीप्रमाणे (Industry regulations) प्रकल्पांसाठी असलेल्या दरांना मार्चपर्यंत मुदतवाढ (Extension) देण्यात यावी, असे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई (Industry Minister Subhash Desai) यांनी कृषीमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत दिले.

जलदगतीने पुर्ण करण्यात आलेल्या अजंग-रावळगाव औद्योगिक वसाहत (Industrial estate) टप्पा क्रमांक 3 च्या प्रलंबित कामाबाबत आज मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस एमआयडीसीचे (MIDC) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन (Chief Executive Officer Dr. P. Unbalagan), सहसचिव संजय देगांवकर (Joint Secretary Sanjay Degaonkar), उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय काटकर (Deputy Chief Executive Officer Sanjay Katkar), अवर सचिव किरण जाधव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी एमआयडीसीअंतर्गत असलेल्या समस्या मांडून ना. भुसे यांनी मालेगाव (malegaon) येथील उद्योजकांसाठी केलेल्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले.

मालेगाव एमआयडीसी (melgaon midc) अंतर्गत असलेली प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करण्यात यावीत. येथील उद्योग प्रकल्प तातडीने सुरू करण्यात यावेत. एमआयडीसी अंतर्गत रस्त्यांच्या कामासंदर्भातील कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करावी. व्यवसायासाठी प्रकल्पांना देण्यात येणारे दर हे 600 रूपये प्रमाणेच मार्चपर्यंत ठेवण्यात यावेत, त्यानंतर 790 प्रमाणे दर करण्यात यावेत.

जे प्रकल्प काम सुरू करीत आहेत त्यांना तात्पुरत्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पाणीपुरवठा योजना क्रमांक दोनसाठी टेंडरची प्रक्रिया करण्यात यावी. वीजेसंदर्भातही सध्या तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करावी. त्यासाठी ऊर्जा विभागाकडे पाठपुरावा करून ऊर्जेसाठी एमएससीबीचे सबस्टेशन तयार करण्याचे निर्देश उद्योगमंत्री देसाई यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. प्लास्टिक, वस्त्रोद्योग अन्न व इतर उद्योगांसाठी सुधारित अभिन्यासास मान्यता देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देशही उद्योगमंत्री देसाई यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com