राज्य महिला आयोगातर्फे लवकरच अधिवेशन

राज्य महिला आयोगातर्फे लवकरच अधिवेशन

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

राज्य महिला आयोगाच्या (State Women's Commission) माध्यमातून महिलांवर होत असलेले अत्याचार (atrocity) थांबावेत तसेच महिलांशी संबंधित असलेले प्रलंबित खटल्यांची माहिती घेण्यासह महिलांची प्रगती व त्यांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जात आहेत. मालेगावी देखील महिला आयोग आपल्या घरी या माध्यमातून लवकरच अधिवेशन (Convention) घेतले जाणार असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी येथे बोलतांना दिली.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (State Women's Commission Chairperson Rupali Chakankar) यांनी मालेगाव (malegaon) येथे भेट देत राष्ट्रवादीचे माजी आ. शेख रशीद (Former NCP MLA. Sheikh Rashid) व महापौर ताहेरा शेख (Mayor Tahera Sheikh) यांच्या निवासस्थानी उपस्थित महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी माजी आ. शेख रशीद, महापौर ताहेरा शेख यांच्यासह नगरसेविकांनी चाकणकर यांचे स्वागत करीत सत्कार केला.

यावेळी महिला पदाधिकार्‍यांशी चर्चा करतांना चाकणकर यांनी शहरातील महिलांच्या प्रगती संदर्भात तसेच त्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली. महिलांवरील होत असलेले अत्याचार रोखण्याच्या दृष्टीकोनातूनच राज्य महिला आयोग (State Women's Commission) संपुर्ण राज्यात दौरा करून माहिती घेत असून मालेगावी देखील आयोग आपल्या घरी या मोहिमेव्दारे अधिवेशन घेणार असल्याचे सुतोवाच चाकणकर यांनी यावेळी बोलतांना केले.

यावेळी माजी आ. आसिफ शेख, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा यास्मीन सैय्यद, कार्याध्यक्षा अ‍ॅड. सुचेता सोनवणे, शकील बेग, नगरसेविका जैबुन्निसा नुरूल्ला, कमरून्निसा रिजवान, नुरजहॉ, रियाज अली, मन्नान बेग, शाहीद काजी, नईम मिर्झा, मनमोहन शेवाळे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com