विद्युत मजदूर संघाचे आजपासून अधिवेशन

विद्युत मजदूर संघाचे आजपासून अधिवेशन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भारतीय मजदूर संघ ( Indian Trade Unions ) या देशातील एक क्रमांकाच्या केंद्रीय कामगार संंघटनेला संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्युत कामगार महासंघाच्या (All India Federation of Electrical Workers )सुवर्ण जयंंती वर्षातील 17 वे त्रैवार्षिक अधिवेशन 14 व 15 मे रोजी नाशिक येथे नाशकात होत असल्याची माहिती अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंंघाचे अध्यक्ष आर. मुरली कृष्णन, महामंत्री अमर सिंह, उप महामंत्री अरूण देवांगण, प्रभारी विद्युत क्षेत्राचे अख्तर हुसेन, केंद्रीय सचिव जयेंंद्र गढवी, संंघटन मंत्री विलास झोडगेकर व भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एल. पी. कटकवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे विद्यार्थी वसतीगृह संचलित देवधर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात होत असलेल्या अधिवेशनासाठी 20 राज्यातील 500 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

14 मे रोजी होणार्‍या अधिवेशनाचे उद्घाटन विद्युत मजदूर महासंघाचे संंस्थापक सदस्य व माजी अध्यक्ष के. के. हरदास यांच्या हस्ते होणार असून महाराष्ट्र प्रदेश भारतीय मजदूर संंघाचे अध्यक्ष अनिल ढुमणे हे स्वागताध्यक्ष म्हणून देशभरातून आलेल्या प्रतिनिधींचे स्वागत करणार आहेत.

भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी. सुरेंद्रन, राष्ट्रीय मंत्री रामनाथ गणेश प्रमुख अतिथी व मार्गदर्शक असणार आहेत. भारतीय मजदूर संघाचे क्षेत्रिय संघटन मंत्री सी. व्ही. राजेश, उद्योग प्रभारी अख्तर हुसेन आणि भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि विद्युत निगम प्रभारी एल. पी. कटकवार यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन सर्वांना लाभणार आहे.

या अधिवेशनात विद्युत क्षेत्राला भेडसावणार्‍या समस्या, केंद्र व राज्य सरकारे घेत असलेले परस्परविरोधी निर्णय, कामगार व कामगार संंघटना विरोधी पारित झालेले कायदे, शासकीय विद्युत क्षेत्राचा होत असलेला संंकोच आदी विषयांवर या अधिवेशन चर्चा होऊन पुढील रणनिती निश्चित केली जाणार आहे.

विद्युत क्षेत्रापुढे येणार्‍या आव्हानांचा तितक्याच खंबीरपणे मुकाबला करण्यासाठी संंपूर्ण जबाबदारी युवा नेतृत्वाकडे सोपवली जाणार असून विविध प्रस्तावही यावेळी पारित केले जाणार असल्याचेही त्यांंनी सांगितले.

सुवर्ण जयंंती वर्षात संपन्न होणारे अधिवेशन घेण्याची संधी महाराष्ट्राला मिळाली आहे व या संंधीचे सोने करण्याचा निर्धार कामगार महासंघाचे अध्यक्ष विठ्ठल भालेराव व महामंंत्री अरूण पिवळ, कार्याध्यक्ष सुनील सोमवंशी, संंघटन मंत्री विजय हिंगमिरे यांनी सांगितले. अधिवेशनाची संपूर्ण जबाबदारी नाशिकच्या कार्यकर्त्यांवर सोपवली असून त्यात कुठलीही कमतरता भासणार नसल्याची माहिती अधिवेशन संयोजक विलास झोडगेकर यांंनी दिली.

Related Stories

No stories found.