'त्या' सवलतीच्या घोषणेमुळे बस कर्मचाऱ्यांच्या डोकेदुखीत वाढ

बस सेवा (File Photo)
बस सेवा (File Photo)

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्याचा अर्थसंकल्पात (Budget) अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Finance Minister Devendra Fadnavis) यांनी राज्य परिवहन महामंडळ बसच्या तिकीट दरामध्ये महिलांना 50 टक्के सवलत जाहीर केली.

ही घोषणा होताच काही महिलांचा असा समज झाला की, घोषणा झाली म्हणजे लागलीच अंलबजावणीही होणार ; म्हणुन त्या एसटी बस मध्ये गर्दी करत आहेत. मात्र, अंलबजावणी नेमकी कधी होणार हे माहीती नसल्याने हाफ तिकीटावरुन (Half ticket) काही महिला प्रवासी बस कर्मचाऱ्यांशी वाद घालत असल्याचे दिसून येत आहे.

बस सेवा (File Photo)
उल्हास नदी पॅटर्न राबवून गोदावरीतील पानवेलीचा प्रश्न मार्गी लावा - बनकर

शासन (Government) जोपर्यंत जी. आर. काढत नाही तोपर्यंत ती सवलत लागू होत नसते हे प्रवाश्यांना माहित नसल्यामुळे काही महीला प्रवासी आताच सवलतीचे तिकीट मागत आहेत. त्यावरुन वाहक आणि प्रवासी यांच्यात शाब्दीक चकमकही होत आहे. महीलेबरोबरचे नातेवाईक तर वाहकासोबत हुज्जत घालत आहेत, मारहाण केल्याच्या देखील घटना काही ठिकाणी निदर्शनास येत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

अशीच घटना नुकतीच लातुरकडे जातांना बस मध्ये घडली. बस वाहक गोविंद मुंडे (Bus Conductor Govind Munde) यांना प्रवासी भाड्याच्या सवलतीवरून महिलेसोबत असणाऱ्या नातेवाईकांकडून धक्काबुक्की झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये वाहकाला शारीरिक दुखापतही झाली. त्यामुळे महिलांच्या तिकीट दरातील सवलतीच्या घोषणेने बस कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com