जि.प.त ठेकेदार व कार्यकारी अभियंता यांच्यात बाचाबाची

मार्च अखेरच्या कामांची बिले काढण्याची लगबग
जि.प.त ठेकेदार व कार्यकारी अभियंता यांच्यात बाचाबाची

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेत ( Zilla Parishad Nashik ) मार्च अखेरच्या कामांनी ( March Ending Work ) चांगलाच वेग आला आहे.मार्च अखेर दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने वेळेत कामांची बिले मंजूर करण्यासाठी ( Approval of Works Bills ) ठेकेदारांची ( Contractors ) बांधकाम विभागात वर्दळ वाढली आहे.

कामांच्या बिलांवरुन बांधकाम विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज आणि ठेकेदारांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे वृत्त आहे.बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जागेवर बसत नसल्याची ओरड ठेकेदारांकडून नित्याची झाली आहे.यातही बांधकाम विभाग क्रमांक एकबाबत सर्वाधिक ओरड आहे.

कार्यकारी अभियंता कार्यालयात जास्त वेळ बसतच नसल्याने ठेकेदारांची अडचण होते. त्यात बिल सादर कारण्याची ऑनलाईन प्रणाली अत्यंत धिम्या गतिने सुरू असल्यामुळे त्यातही बहुतांश वेळ जातो. एकदा केलेली प्रक्रिया अर्धावर राहिली तर पुन्हा नव्याने ती सादर करावी लागत असल्याने ठेकेदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. ही प्रणाली राज्यस्तरावर असल्यामुळे त्याबाबत धोरणात्मक निर्णय राज्य सरकारच्या पातळीवर घेतला जाईल. त्यामुळे प्रणालीचा स्विकार करुनच ठेकेदारांना काम करुन घ्यावे लागत आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात मंगळवारी (दि.29) कामानिमित्त आलेल्या काही ठेकेदारांनी कामांच्या मंजूरीवरुन थेट कार्यकारी अभियंत्यांना विचारणा केली. यावरुन बाचाबाची झाल्याचे समजते. या प्रकरणानंतर ठेकेदारांना आतमध्ये येण्यास मज्जाव करण्यात आला. प्रवेशद्वारावरच आडवे बाकडे लावण्यात आल्याने ठेकेदारांना प्रवेश मिळाला नाही. दुपारनंतर कार्यकारी अभियंत्यांनी घरी बसूनच फाईल्स् निकाली काढल्याचे समजते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com