मनपातील 'ते' वादग्रस्त कार्यालय सील

नाशिक मनपा
नाशिक मनपा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिका (Nashik Municipality) मुख्यालयात असलेल्या मुन्सिपल कामगार कर्मचारी संघटनेचे (Municipal Labor Employees Association) कार्यालय पोलिसांनी अखेर सील केले आहे. शिंदे गटात सामील झालेले तसेच अध्यक्ष असलेले माजी नगरसेवक प्रवीण तिदमे (Former Corporator Pravin Tidme) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

कामगारांना हक्क मिळवून देण्यासाठी संघटनेची स्थापना करण्यात आली त्या संघटनेच्या अध्यक्ष पदावर ठाकरे गट आणि शिंदे गटाने दावा ठोकल्याने संघटनांनी हक्क सांगितल्यानं हे प्रकरण पोलीस ठाण्यात (police station) गेले आहे. या वादामुळं कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठीचं व्यासपीठच बंद झालं आहे. त्यामुळं आता हा वाद कसा आणि कधी मिटणार याकडे लक्ष लागून आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) नाशिक (nashik) मध्ये आले असता ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी कार्यलय ताब्यात घेतले होते. यांनतर प्रवीण तिदमे यांनी बडगुजर यांच्यासह दीडशे जणांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाच्या भांडणाचा कामगारांना फटका बसतोय.

महापालिकेच्या म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदावर बाळासाहेबांची शिवसेना (shiv sena) आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) या दोन्ही गटाच्या महानगर प्रमुखांनी दावा सांगितला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com