मेडिकल ऑक्सिजनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष; असा करा संपर्क
District Collector

मेडिकल ऑक्सिजनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष; असा करा संपर्क

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात कोवीड बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना समन्यायी प्रमाणात मेडीकल ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्याचे हेतुने, मेडीकल ऑक्सिजनचे नियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मेडीकल ऑक्सिजन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा मेडिकल ऑक्सिजन नियंत्रण कक्षाचे समन्वयक दत्तप्रसाद नडे यांनी दिली आहे.

नाशिक महानगरपालिका, मालेगांव महानगपालिका व नाशिक ग्रामिण भागातील रुग्णालयांतील मेडीकल ऑक्सिजन संबधी समस्यांच्या निराकरणासाठी जिल्हास्तरावर स्थापन केलेल्या

नियंत्रण या कक्षाचा संपर्क क्रमांक 9405869940 असा आहे, असेही अतिरिक्त जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com