समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान : सराफ

समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान : सराफ

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी | Pimpalgaon Basvant

विद्यार्थी मनाला समजून घेऊन त्यांच्या पंखात बळ देऊन आकाश कवेत घेण्याचे स्वप्न नेहमी शिक्षक (teacher) दाखवत असतात. वेळप्रसंगी शिक्षाही करतात. परंतु त्यामागील हेतू शुद्ध असतो.

योग्य त्या वयात त्यांनी दिलेली संस्काराची पुंजी विद्यार्थ्यांना (students) आयुष्यभर पुरते. अशा शिक्षकांच्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग करून घ्या. समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन जगन्नाथपुरी (Jagannathpuri) येथील इंडिया डी झोन जेसीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेश सराफ (Rajesh Saraf, National Vice President, India D Zone JC) यांनी केले आहे.

येथील शिवाजी नगरमधील ज्येष्ठ नागरिक संघ भवनमध्ये जेसिआयचे झोनल अध्यक्ष विकास आथरे (JCI Zonal President Vikas Athare) यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक गौरव सोहळा संपन्न करण्यात आला. त्यावेळी व्यासपीठावर जेसीआय इंडिया चे राष्ट्रीय उपाध्यक्ष जेसी राजेश सराफ, झोन 13 चे अध्यक्ष जेसी सौरभ बर्डिया, अध्यक्षस्थानी झोन ऑफिसर जेसी विकास आथरे, ग्रेपटाऊन अध्यक्ष तन्वीर शेख, सेक्रेटरी रोहित घोडके, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव डॉ.वाटपाडे उपस्थित होते.

राजेश सराफ पुढे बोलताना म्हणाले की, पिंपळगाव बसवंत ग्रेप टाऊन जेसिआयचे (Pimpalgaon Baswant Grape Town JCI) कामकाज पाहून मी भारावून गेलो. जेसिआयने स्वतःच्या विकासाबरोबर सेवेच्या माध्यमातून समाजाच्या विकासाला वाहून घ्या असे आवाहनही राजेश सराफ यांनी यावेळी केले. झोनल 13 चे अध्यक्ष जेसी सौरभ बर्डिया यांनी पिंपळगाव जेसीआयच्या कामाचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले की, माणसाने आयुष्यात सदा आंनदी रहावे. इतरांना आनंद देत देत स्वत: आनंदी व्हावे. आपण आपल्या आयुष्यात सदैव सतर्क रहावे. प्रत्येकाच्या आयुष्याला शिक्षक आकार देतात, दिशा देतात म्हणून जीवनात गुरुचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे असे सांगून त्यांनी जेसिआयने राबविलेल्या उप्रकमांचे मनापासून कौतुक केले.

तसेच कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी जेसिआयच्या श्रीमती.आथरे यांनी सर्वाना शपथ दिली. त्यानंतर जेसिआयच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तर महिला जेसीआयच्या उपाध्यक्ष स्मिता कुशारे यांनी त्यांचे औक्षण केले. पिंपळगाव बसवंत ग्रेपटाऊनचे अध्यक्ष तन्वीर शेख यांनी जेसीआयच्या कामाचा धावता आढावा आपल्या मनोगतातून अतिथींसमोर मांडला. यांनतर पिंपळगाव जेसिआयचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर कापडी यांनी जेसीआय इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जेसी राजेश सराफ, झोन 13 चे अध्यक्ष जेसी सौरभ बर्डिया यांच्या कार्याचा परिचय करून दिला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मानपत्र देऊन कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला.

सत्कारर्थी मध्ये लतिका मराठे, भालचंद्र मालपुरे, जयश्री शिंदे, जी.जे. शिंदे, श्रीमती.जाधव, सावळीराम शिंदे, अरुण जाधव, प्रा.डी.डब्ल्यू. शेळके, प्रा.वाय.बी. वाघ, मुकुंद जाधव, सुधीर भाबर, ए.व्ही. जाधव, प्रा.साहेबराव माळोदे, श्रीमती. कुशारे, एस.के. पाटील, अरुण तुपे, उल्हास मोरे, प्रा.उशीर, प्रा.लक्ष्मण महाडिक यांचा समावेश होता. शिक्षक बंधू-भगिणींच्या वतीने प्रा.लक्ष्मण महाडिक यांनी सत्काराला उतर देत जेसिआयच्या सर्व पदाधिकारी यांच्या कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी पिंपळगाव परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.