सिन्नरकरांच्या आरोग्यासाठी वैद्यकिय संघटनांचे योगदान: आ. कोकाटे

सिन्नरकरांच्या आरोग्यासाठी वैद्यकिय संघटनांचे योगदान: आ. कोकाटे

सिन्नर। प्रतिनिधी| Sinar

तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य (health) अबाधित राखून निरोगी वातावरण तयार करण्यात तालुका वैद्यकीय सेवाभावी संस्थेचे (Medical Charitable Organization) योगदान उल्लेखनिय असल्याचे आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) यांनी केले.

सिन्नर तालुका (sinnar taluka) वैद्यकीय व्यावसायिक सेवाभावी संस्थेच्या यशवंत नगर येथे उभारण्यात आलेल्या ‘यशवंत सभागृहा’च्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपिठावर आमदार डॉ. राहूल आहेर (MLA Dr. Rahul Aher), माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Waje), संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुरुळे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, डॉ. दत्तात्रय गडाख, माजी किरण डगळे, डॉ. ज्ञानेश्वर थोरात, माजी नगरसेविका गीता वरंदळ उपस्थित होते.

वैद्यकीय व्यवसायातील अनुभवांची देवाण-घेवाण करण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमांसाठी वैद्यकीय व्यावसायिकांनी उभारलेला हा हॉल भविष्यात लाभदायी ठरेल अशी अपेक्षा कोकाटे यांनी व्यक्त केली. नाशिक (nashik) येथील आयएमएच्या धर्तीवर सिन्नरच्या डॉक्टरांनी पुढाकार घेत लोकवर्गणीतून या हॉलची उभारणी केली आहे. त्यात आमदार माध्यमातून मी माझा वाटा उचलला.

भविष्यात आणखी मदत करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यशवंत हॉलसाठी जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल डॉ. संदीप मोरे, डॉ. ज्योती मोरे यांच्यासह मोरे परिवाराचा यावेळी संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. सिन्नर तालुका वैद्यकीय व्यावसायिक सेवाभावी संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुरुळे यांनी प्रास्ताविक केले.

डॉक्टर सभासदांबरोबरच आ. यांनी या हॉलसाठी निधी (fund) उपलब्ध करुन दिल्याने ही वास्तू आकारास आल्याचे ते म्हणाले. डॉ. थोरात, आ. आहेर, तांबे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन डॉ. सचिन सोनवणे, डॉ. सुजाता लोहारकर यांनी केले. आभार डॉ. विजय लोहारकर यांनी मानले. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

आ. तांबेंना मदत करु

डॉ. सुधीर तांबे आणि दुर्गाताई तांबे या दाम्पत्याचा आपल्या तालुक्यात दांडगा जनसंपर्क आहे. आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढत वाढदिवस आणि इतर छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावून तालुक्यात त्यांनी मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे डॉ. तांबे तालुक्यात उभे राहतात की काय अशी शंका येते. मात्र, वाजे-कोकाटे म्हणून आमचं चांगलं आहे.

तुम्ही पदवीधर मतदार संघातच योग्य आहात. अशी मिश्कील टिपणी करत तालुक्याच्यावतीने आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मदत करुन पुन्हा निवडून देऊ अशी ग्वाही आ. कोकाटे यांनी दिली. शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वपक्षीय नेत्यांचा मिलाप या कार्यक्रमाच्या निमित्ताने घडविल्याने डॉक्टर संघटनेलाही त्यांनी धन्यवाद दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com