विकासात अभियंत्यांचे योगदान: झिरवाळ

विकासात अभियंत्यांचे योगदान: झिरवाळ

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

कोविडच्या (covid-19) संकट काळात राज्यातील अभियंत्यांनी उत्कृष्ठ कामे केली. तसेच राज्याच्या विकासकामात मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यामुळे लौकिकात भर पडली आहे, असे गौरवोद्गार विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Deputy Speaker of the Legislative Assembly Narhari Jirwal) यांनी काढले.

सरळसेवा प्रविष्ट वर्ग-1 अभियांत्रिकी अभियंता अधिकारी संघटनने (Engineering Engineers Officers Association) आयोजित केलेल्या 2022 च्या दैनंदिनी व दिनदर्शिकेचे प्रकाशन (Publication of the calendar) झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.

संघटनेचे अध्यक्ष हरिभाऊ गिते, दैनंदिनी प्रतिनिधी प्रविण पाबळे, प्रमुख मार्गदर्शक डॉ. महेंद्र नाकील, सदस्य राजेंद्र धुम उपस्थित होते. यावेळी वेळी संघटनेचे इतर पदाधिकारी व संघटनेचे सदस्य राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग (Department of Public Works), जलसंपदा विभाग (Department of Water Resources),

मृद व जलसंधारण विभाग (Department of Soil and Water Conservation) व पाणी पुरवठा विभागातीस (Water Supply Department) सहाय्यक अभियंते, कार्यकारी अभियंते, अधीक्षक अभियते यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. संघटना अध्यक्ष हरिभाऊ गीते यांनीे आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com