स्वातंत्र्य चळवळीत कॉम्रेड डांगे यांचे योगदान: प्रांत पठारे

स्वातंत्र्य चळवळीत कॉम्रेड डांगे यांचे योगदान: प्रांत पठारे

निफाड। प्रतिनिधी | Niphad

जागतिक कीर्तीचे व साम्यवादी कम्युनिस्ट पक्षाचे (Communist Communist Party) संस्थापक कॉम्रेड श्रीपाद (Founder Comrade Shripad) (भाई) अमृता डांगे (Amrita Dange) हे करंजगावचे (Karanjagaon) भूमिपुत्र होते, हा नाशिक जिल्ह्याला (nashik district) सार्थ अभिमान आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत (United Maharashtra Movement) त्यांचा सिंहाचा वाटा आहे. स्वातंत्र्य चळवळीतही त्यांनी सतरा वर्षे कारावास भोगल्याने स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांचे अतुलनीय योगदान असल्याचे प्रतिपादन निफाडच्या उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे (Dr. Archana Pathare Sub Divisional Officer of Niphad) यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त करंजगाव येथील जनता विद्यालयात कॉम्रेड (भाई) डांगे यांच्या गौरवार्थ आयोजीत कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना डॉ.पठारे बोलत होत्या.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार शरद घोरपडे, करंजगाव सरपंच प्रज्ञा नंदू निरभवणे, उपसरपंच वर्षा किरण जाधव, तालुका आरोग्य अधिकारी शरद कोशिरे, गटशिक्षण अधिकारी केशव तुंगार, मंडळ अधिकारी केवारे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती. गांगुर्डे, तलाठी प्रसाद देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, एबीडीओ सानप, युवा नेते शहाजी राजोळे, गटनेते रावसाहेब राजोळे, माजी सरपंच खंडू बोडके, वसंत जाधव, ग्रा.पं. सदस्य नामदेव पवार, विलास राजोळे, सुनीता राजोळे, कुसुम राजोळे, मुख्याध्यापिका श्रीमती. जाधव, धोंडू भगूरे, प्रभाकर लचके, रामेश्वर राजोळे, चेअरमन प्रभाकर दराडे, ग्रामसेवक जाधव उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या निर्देशाने निफाड तहसील (Niphad Tehsil) व ग्रामपालिका (gram palika) करंजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रारंभी प्रांत अर्चना पठारे व तहसीलदार घोरपडे यांच्या हस्ते सरस्वती व कॉम्रेड डांगे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी (students) स्वागतगीत सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना डोमेसाईल (Domicile) वाटप, सातबारा वाटप, घरकुल लाभार्थ्यांना चावी प्रदान, करोना लसीकरण (corona vaccination), वृक्षारोपण (tree plantation), नेत्र तपासणी (Eye examination), रांगोळी प्रदर्शन, स्वातंत्रसैनिक वंशज सत्कार आदी उपक्रम राबविण्यात आले.

यापूर्वी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका श्रीमती. जाधव यांनी प्रास्ताविक केले. कामगार तलाठी प्रसाद देशमुख यांनी कॉम्रेड डांगे यांच्यावर लिहिलेली कविता वाचून दाखवत त्यांचे कार्य सांगितले. तर माजी सरपंच खंडू बोडके यांचेसह विद्यार्थी दर्शन राजोळे याने कॉम्रेड श्रीपाद (भाई) डांगे यांचे जीवनचरित्र आपल्या मनोगतातून व्यक्त केले. सूत्रसंचालन शिक्षक कदम यांनी केले तर सुनील जाधव यांनी आभार मानले.

याप्रसंगी एकनाथ पीठे, भीमा कोटकर, रोहिदास कामडे, पुंजा भगूरे, बाळू कोटकर, मंगेश राजोळे, नंदू राजोळे, अशोक राजोळे, मधूकर राजोळे, प्रवीण भागवत, शंकर राजोळे, वासुदेव जाधव, डॉ.नीता तडवी, कांडेकर, बैरागी, सुरेश गांगुर्डे, रवींद्र पवार, तलाठी हिरे, कोतवाल दिगंबर गायकवाड, ज्ञानेश्वर खालकर, कैलास टिळे, सुकदेव भगूरे, सोमनाथ ससाणे, राहुल कामडे, दीपक पवार, नाना पवार, अतुल तांबे आदींसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

शाळेला डांगे यांचे नाव द्या स्वातंत्र्य लढ्यात भरीव योगदान देणारे करंजगावचे भूमिपुत्र कॉम्रेड श्रीपाद (भाई) अमृता डांगे यांच्या आठवणी चिरंतर रहाव्या यासाठी जिल्हा परिषदेने नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत इमारत बांधून देवून त्यास कॉम्रेड श्रीपाद (भाई) डांगे यांचे नाव देण्यात यावे. भाई डांगे यांच्या कन्या स्वर्गीय रोजाताई देशपांडे या तीन दशकांपूर्वी करंजगावला येवून गेल्या होत्या. त्याची आठवण देखील यावेळी करून देण्यात आली. कॉम्रेड भाई डांगे यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान अतुलनीय होते. त्यामुळे इमारतीला त्यांचे नाव देणे उचित ठरेल.

- खंडू बोडके, माजी सरपंच (करंजगाव)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com