क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याचे भासवून ठेकेदाराचे अपहरण
नाशिक

क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याचे भासवून ठेकेदाराचे अपहरण

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक |Nashik

पोलीस असल्याची बतावणी करून दोघांनी सरकारी ठेकेदराचे दोघांनी अपहरण करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा प्रकार मंगळवारी (दि.१८) सकाळी जयभवानी रोड परिसरात घडली.

याप्रकरणी शिलसिंह ओमप्रकाश नेहरा (५२, रा. प्रिन्स हाऊस जयभवानी रोड, नाशिकरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे.

त्यानुसार, मंगळवारी सकाळी नेहरा हे कार्यालयात जाण्यासाठी घरून निघाले असता घराच्या जवळच दोघांनी त्यांचे वाहन थांबवले. आम्ही क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याचे सांगत बळजबरीने त्यांच्या वाहनात बसले.

तुमच्या विरोधात एका महिलेची तक्रार असून वाहन पोलीस ठाण्याकडे घ्या अशी धमकी देत त्यांच्या इशार्‍यानुसार वाहन चालवण्यास भाग पाडले.

परंतु नेहरा यांनी शंका आल्याने त्यांनी वाहन थांबवताच दोघांनी गाडीतून खाली उतरत तुला तसेच परिवाराला पाहुण घेऊ अशी जीवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर संशयित पसार झाले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार एस. व्ही. कोकाटे करत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com