मुखेडला विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू

मुखेडला विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू

येवल्यात रास्ता रोको

येवला | Yeola

तालुक्यातील (Yeola Taluka) मुखेड परिसरात विजेच्या खांबावर काम करत असतांना विजेचा धक्का (Electric Shock) लागून कंत्राटी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू (Death of contract worker) झाल्याची घटना शनिवार (दि.१७) रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी महावितरणच्या (Mahavitran) विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी शहरातील नगर-मनमाड महामार्गावर (Nagar-Manmad Highway) रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Agitation) केले.

तालुक्यातील रायते (Rayte Village) येथील रहिवासी राधु लक्ष्मण शेळके (वय ४०) हे येवला तालुक्यातील मुखेड परिसरात विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम (Light Repairing Work) करत असतांना अचानक त्यांना विजेचा धक्का लागला. विजेच्या लागलेल्या जबर धक्क्यामुळे ह्या कंत्राटी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

हा कामगार विजेचे काम करत असतांना वीजप्रवाह बंद करण्यात आला नव्हता का? किंवा हा प्रवाह अचानक कोणाकडून व कसा सुरू झाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महावितरणच्या या ढिसाळ कारभारावर परिसरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. सदर प्रकरणातील दोषींवर काय कठोर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महावितरण कंपनीकडून सदर कंत्राटी कामगाराच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी देखील परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.घटनेची माहिती मिळताच येवला शहर व परिसरातील नातेवाईकांकडून तसेच नागरिकांकडून शहरातील रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती.

दरम्यान सायंकाळी भाऊ विनोद शेळके व नातेवाईकांनी नगर-मनमाड महामार्गावर प्रशासकीय संकुला समोर रस्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी फिर्यादीत महावितरणचा उल्लेख करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

त्यानुसार फिर्यादीमध्ये महावितरणचा उल्लेख करण्याचे आश्वासन देत नातेवाईकांची पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी समजूत काढली त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com