बरसो रे मेघा मेघा...! नाशकात पावसाची संततधार

बरसो रे मेघा मेघा...! नाशकात पावसाची संततधार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यात मुसळधार पाऊस (Rain) बरसत असला तरी नाशिक जिल्ह्यात मात्र जोरदार पावसाची (Heavy Rain) प्रतीक्षा होती. काल त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) व इगतपुरीत (Igatpuri) दमदार पाऊस झाला. आता नाशिक शहरात संततधार पावसाला सुरुवात झाली आहे...

जुलै महिना उजाडून एक आठवडा झाला असताना नाशिक शहरासह जिल्ह्यात चांगल्या पावसाची प्रतीक्षा होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने (Rain) दडी मारली.

जिल्ह्यातील धरणांत केवळ 26 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्ह्याला जोरदार पावसाची गरज आहे. गंगापूर धरणासह (Gangapur Dam) मुकणे धरणात (Mukne dam) महापालिकेचा आरक्षित साठा 15 ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा आहे. गेल्या वर्षी गंगापूर धरणातील 36 टक्के पाणी शिल्लक होते. यंदा 26 टक्के पाणीच शिल्लक आहे.

यामुळे नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. आजपासून दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे जर चांगला पाऊस झाल्यास पाणी कपातीचे संकट टळण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com