
नाशिक | प्रतिनीधी | Nashik
येथील प्रभाग क्रमांक 23 भारत नगर, शिवाजी वाडी आदी भागात मागील काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा (Contaminated water supply) होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
याबाबत आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) वतीने महापालिका आयुक्तांना (Municipal Commissioner) निवेदन (memorandum) देण्यात आले असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने त्वरित याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
भारत नगर, शिवाजीवाडी शासकीय शाळे मागील हिना किराणा जवळील गल्लीत नळात दूषित, जंतू युक्त गटारीचे (sewer) माती मिश्रित पाणी येत आहे. या दूषित व जंतू युक्त पाणी पुरवठा होत असल्याने लहान मुले व नागरीक आजारी पडत आहे.
मागे काही दिवसांपूर्वी याच गल्लीच्या जवळ मदरसा यासीन शाह गल्लीत असेच दूषित पाणी (Contaminated water) येत होते. त्यावेळी मनपाने तात्पुरती 2 ईंची नवीन पाइप लाईन टाकून दिली होती, तशीच तात्पुरती स्वरूपाची लाईन येथेही टाकण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) तर्फे करण्यात आली आहे. माजीद खान, अल्ताफ शेख आदींच्या सह्या आहेत.