
लासलगाव । वार्ताहर Lasalgaon
लासलगाव ग्रामपालिका( Lasalgaon Town Council ) हद्दीत नळाला येणारे पाणी अत्यंत गढूळ आणि पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांच्या आरोग्याची खेळण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. ग्रामपंचायतीने शुद्ध पाणीपुरवठा करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे.
शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी माजी मंत्री छगन भुजबळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीना बनसोड,निफाड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप कराड यांच्याकडे निवेदन दिले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून लासलगाव सह 16 गावांना पाणीपुरवठा करणारी योजना वारंवार फुटत असल्याने नागरिकांना महिन्यातून एकदा किंवा दोनदाच पाणी येत अशे त्यात अत्यंत गढूळ पाणी नळाला येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार लासलगाव ग्रामपालिकेकडून केला जात आहे.
याबाबत इरिगेशन कॉलनी, कॉलेज रोड या ठिकाणी नळाला आलेले गढूळ पाणी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी लासलगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अफजल शेख, ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी श्याम खलसे, प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव वाकडा आरोग्य सेवक शेंद्रे यांच्या उपस्थित दाखवले.
लासलगाव ग्रामपंचायत व लासलगाव विंचूरसह सोळा गाव पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती समिती कित्येक दिवसापासून अशाच प्रकारे पाणीपुरवठा करत असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्याची खेळण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाण्यामुळे रोग होण्याची शक्यता आहे . या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी ग्रामपंचायतची असेल, असे पाटील यांनी म्हटले आहे.