मनपाकडून दूषित पाणीपुरवठा; राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा

मनपाकडून दूषित पाणीपुरवठा; राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

शहरातील बारा बंगला, लोढा भवन, स्टेट बँक परिसर आदी भागात सध्या सध्या होत असलेला दूषित पाणीपुरवठा (Contaminated water supply) थांबवून तातडीने शुध्द पाणीपुरवठा (Pure water supply) करावा. अन्यथा, तीव्र आंदोलन (agitation) करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (Nationalist Congress) देण्यात आला आहे.

याबाबत मालेगाव महानगर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अनंत भोसले (Anant Bhosale, Working President of Malegaon Metropolitan NCP) व प्रदेश सचिव दिनेश ठाकरे (State Secretary Dinesh Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली मनपा उपायुक्त गणेश गिरी यांना निवेदन (memorandum) देण्यात आले. बारा बंगला, लोढा भवन, स्टेट बँक परिसरात सध्या होणार्‍या दूषित पाणीपुरवठ्यामुळे (Contaminated water supply) नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नजीकच्या काळात पावसाळा सुरू होत असून या कालावधीत साथीचे आजार फैलावण्याची शक्यता असते.

त्यातच मनपाकडून दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. उपरोक्त भागात शहरातील उच्च शिक्षित व व्यापारी वर्गाचे वास्तव्य असून विविध शासकीय कार्यालये, बँका, हॉटेल्स, सिनेमा थिएटर, शाळा, उद्यान, हॉस्पिटल इत्यादी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहेत. दूषित पाणीपुरवठ्यामुळे संपूर्ण शहराचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. यास्तव तातडीने दूषित पाणीपुरवठा थांबून शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा,

अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जनआंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देणार्‍या ष्टिमंडळात अनिल सोनवणे, योगेश भावसार, गणेश लोखंडे, त्र्यंबक पाटील, चंद्रकला सूर्यवंशी, अपूर्व परदेशी, दीपाली परदेशी, जयश्री भावसार, मंगला गोरे, चंद्रकला चौधरी, सुनंदा ऐशी, सरला ठाकूर, नीलिमा पाटील, मिराबाई गोरे, सुनिता चिकणे आदिंचा समावेश होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com