नांदगावजवळ शीतपेयांनी भरलेला कंटनेर उलटला

नांदगावजवळ शीतपेयांनी भरलेला कंटनेर उलटला

नांदगाव । Nandgoan

येथील रेल्वे ओव्हर ब्रीजजवळील वळणावर समोरुन रिक्षा आल्याने कंटनेर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने कंटनेर उलटला. यात कंटनेरसह साहित्याचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. (Road Accident near nandaon city)

याबाबत माहिती अशी की, रेल्वे ओव्हर ब्रीजजवळ वळणावर समोरुन रिक्षा आल्याने कंटनेर (जीजे ०५ एव्ही ७८८२) चालक अभिनव सिंगने अवघड वळणावरुन जात असताना अचानक समोरून रिक्षा आल्याने ब्रेक लावले.

यावेळी कंटनेरमध्ये साहित्य असल्याने तो उलटला. सामानाचे व कंटनेरचे मोठे नुकसान झाले असून याबाबत पो.हवा. राजु मोरे अधिक तपास करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com