कसारा घाटात कंटेनर उलटला; दोन जखमी

कसारा घाटात कंटेनर उलटला; दोन जखमी

नाशिक | Nashik

नाशिक-मुंबई महामार्गावर (Nashik-Mumbai Highway) नवीन कसारा घाटात (Kasara Ghat) कंटेनर घाट उतरत असताना चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर उलटण्याची घटना घडली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक-मुंबई महामार्गावर (Nashik-Mumbai Highway) नवीन कसारा घाटातून कंटेनर क्रमांक एमएच 04 जेके 0315 जात होता, यावेळी चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला.

त्यामुळे कंटेनर लतिफवाडीच्या वळणावर उलटला. या अपघातात (Accident) क्लीनर हा बाहेर फेकला जाऊन जखमी झाला. तर चालक हा कंटेनरमध्ये अडकल्याने त्यास एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर आपत्ती व्यवस्थापन टीमने महामार्ग पोलिस केंद्रांच्या कर्मचाऱ्यांसोबत क्रेन व जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढले.

कसारा घाटात कंटेनर उलटला; दोन जखमी
नाशकात तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

यात चालकाचा एक पाय फॅक्चर होऊन गंभीर जखमी झाला आहे. जखमींना पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com