गोवरची लक्षणे आढळल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधा; आरोग्य विभागाचे आवाहन

गोवरची लक्षणे आढळल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधा; आरोग्य विभागाचे आवाहन

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

गोवर (Measles) हा विषाणूपासून होणारा आजार आहे. गोवर विषाणू (Measles virus) रुग्णांच्या खोकल्याद्वारे (Cough) हवेमार्फत पसरतो व संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या श्वसन संस्थेतून शरीरात प्रवेश करतो.

या रोगाची लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता जवळच्या आरोग्य केंद्राशी (Health Center) संपर्क साधावा व काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या (zilha parishad) आरोग्य विभागाने (Department of Health) केले आहे. लसीकरणाच्या (vaccination) वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केल्यास गोवर रोग टाळता येतो. बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण झाले नसेल त्यांचे लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.

वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण (vaccination) केल्यास गोवर रोग टाळता येतो. लसीचा पहिला डोस नऊ महिने पूर्ण ते १२ महिने व दुसरा डोस १६ ते २४ महिने या वयोगटात देण्यात येतो. गोवरची लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी (Primary Health Centre) संपर्क साधावा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने (District Health Department) केले आहे.

मालेगाव (malegaon) मधील गोवरच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे (zilha parishad) जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.हर्षल नेहेते (Maternal and Child Care Officer Dr. Harshal Nehete) यांनी गोवर प्रतिबंधासाठी काही विशेष सूचना दिल्या असून गोवरशी संबंधित सर्व उपायोजना कराण्याचे आवाहन केले आहे. गोवरची लक्षणे बालके आढळल्यास त्वरित लसीकरण करून घ्यावे. यामध्ये नऊ महिने ते बारा महिने पहिला डोस, 16 महिने ते 24 महिने दुसरा डोस घेणे आवश्यक आहे.

पाच वर्षाच्या आतील बालकांनी डोस घेतल्यास त्यांना गोवर होणार नाही. गोवर झाल्यास पालकांनी घाबरून जाऊ नये.गोवर लसीकरण (vaccination) हाच उपाय असल्याने लसीकरण त्वरित करून घ्यावे. गोवारमुळे मृत्यू होत नसला तरी यातून निमोनिया, अतिसार,मेंदूज्वर असे रोग बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो.

रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे मृत्युमुखी पडतो. तरी गोवरची लक्षणे असलेले रुग्ण आढळल्यास घरी न थांबता त्यांनी त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होऊन लसीकरण करून घ्यावे. लसीकरण हाच गोवर व प्रभावी उपाय आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नेहेते यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com