ऑनलाइन सोने खरेदीला ग्राहकांची पसंती

साधला अक्षयतृतीयेचा मुहूर्त
ऑनलाइन सोने खरेदीला ग्राहकांची पसंती

नाशिक । प्रतिनिधी

अक्षय्यतृतियेला मुहुर्तावर ऑनलाइनच्या माध्यमातून ग्राहकांनी सोने खरेदीची संधी सराफा व्यावसायिकांनी ग्राहकांना दिली होती.

नाशिककरांनी ही संधी साधत आॅनलाईन सोने खरेदीला पसंती दिली. आॅनलाईन सोने खरेदी विक्रिची सराफा बाजाराची पहिलीच वेळ ठरली.
लॉकडाऊनमुळे बाजारपेठेतील उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे.

सोने व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे.दसरा, दिवाळी,पाडवा,अक्षय्य तृतीया,लग्नसमारंभ तसेच नवजात बाळासाठी दागिने खरेदी केले जात असतात. वर्षभरातील साडेतीन मुहुर्तावर सोने खरेदीला विशेष महत्व दिले जात असल्याने या मुहुर्तावर बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असते.

परंतु कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून लॉकडाऊन करण्यात आले आहे.मध्यंतरीच्या अनलॉक मध्ये सर्व बाजारपेठा टप्याटप्याने सुरू झाल्या होत्या. परंतु रुग्णांची संख्या वाढत चालल्याने परत एकदा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याने सराफी पेढयांवरही त्याचा परिणाम झाला आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठा बंद असल्याने अनेक सराफी व्यावसायीकांनी ऑनलाइनच्या माध्यमातून ग्राहकांसाठी घरबसल्या सोने खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली. लॉकडाऊनमुळे यंदाचा मुहूर्त हुकल्यात जमा होता.परंतु पिढ्यानपिढ्यांच्या विश्‍वास असलेल्या आपल्या सराफांकडून मुहुर्तावर सोने खरेदी करीत असलेल्या ग्राहकांना यंदा प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी शक्य नव्हती.

सराफा व्यावसायीकांनी पुढाकार घेवून चोख सोने,परंपरागत दागिने ऑनलाइनच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांपर्यत पोहचत सोने खरेदीचा मुहुर्त साधण्यास मदत केली. अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर अनेक सराफांनी ऑनलाइन बुकिंग तसेच घरपोच सेवा दिल्याने ग्राहकांनी त्यास पसंती देत खरेदी केली.


दरवर्षी मुहुर्तावर सोने खरेदी करणारा ग्राहकवर्ग आहे.गेल्या वर्षीही अनेकांचे सोनेखरेदीचे मुहुर्त हुकले होते.यंदा ग्राहकांना ऑनलाइन बुकींगद्वारे घरपोच दागिने देण्याची सुविधा दिल्याने ग्राहकांना मुहुर्तावर खरेदीचा आनंद देवू शकलो.

- चेतन राजापूरकर, माजी अध्यक्ष सराफ बाजार

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com