शेतकर्‍यांसाठी ग्राहक कार्यशाळा

शेतकर्‍यांसाठी ग्राहक कार्यशाळा

नांदूरशिंगोटे । वार्ताहर Nandurshingote - Sinnar

शेतकरी (farmers) वीज ग्राहकांना सध्या अनेक समस्यांनी घेरले असून त्यांच्या निवारणासाठी ग्राहकांनी संघटीत व्हावे असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे (All India Consumer Panchayat) प्रदेश संघटक बाळासाहेब आवटी (Balasaheb Avati) यांनी केले.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्यावतीने आयोजित शेतकरी ग्राहक जागरण कार्यशाळेत (Farmer Consumer Awareness Workshop) ते बोलत होते. व्यासपीठावर उदय सांगळे, आनंदराव शेळके, विनायक शेळके, सरपंच गोपाल शेळके, दीपक बर्के उपस्थित होते. ग्राहक चळवळ मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने ग्राहक म्हणून पुढे आले पाहिजे. पर्यावरणाच्या चळवळी इतकीच ग्राहक चळवळही महत्त्वाची आहे असे आवटी म्हणाले.

शोषणमुक्त समाजाची (Exploitation free society) निर्मिती व्यवस्थांमध्ये सुधारणा घडवून आणणे हे ग्राहक चळवळीचे उद्दिष्ट आहे. अर्थ व्यवहाराला ग्राहक शक्तीचा धाक उत्पन्न करायचा आहे असे प्रतिपादन सांगळे यांनी केले. यावेळी महावितरणचे (MSEDCL) सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता व ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव एच. आर. जाधव (District Secretary H. R. Jadhav) व सी. सी. हुमणे यांनीही शेतकर्‍यांशी संवाद साधला.

आनंद शेळके यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी भाऊ पा. शेळके, दामोदर गर्जे, जगन्नाथ केदार, रमेश आव्हाड, एकनाथ शेळके, सुनील सांगळे, रमेश शेळके, सचिन देशमुख, भारत दराडे, नागेश शेळके, अरुण शेळके, सुदाम भाबड, रवींद्र शेळके, रामदास सानप, सोमनाथ सांगळे, नानासाहेब शेळके, भगवान शेळके उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com