सप्तनद्यांच्या उगम स्थानांवर वनराई बंधारा

वनराई बंधार्‍याची श्रमदानातून निर्मिती
सप्तनद्यांच्या उगम स्थानांवर वनराई बंधारा

हरसूल । वार्ताहर Harsul

‘ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी फक्त एक धाव पाण्यासाठी !’ हे ब्रीद वाक्य घेऊन जलपरिषदेने गाव तेथे वनराई बंधारा मोहीम (Vanrai Bandhara) हाती घेतली आहे.

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar), पेठ (peth), सुरगाणा (surgana) तसेच दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) या मोहिमेला ग्रामस्थांच्या श्रमदानातून (Shramdan) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्रातील (maharashtra) केम डोंगराच्या कुशीतील (पायथ्याशी) असलेल्या सप्तनद्यांच्या उगम स्थानांवर वनराई बंधार्‍यांची निर्मिती करत दिंडोरी तालुक्यात वनराई बंधार्‍यांचा शुभारंभ करण्यात आला आहे.

जलपरिषद मित्र परिवाराने गाव तेथे वनराई बंधारा मोहीम हाती घेतली आहे. त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ तसेच दिंडोरी तालुक्यात 200 हुन अधिक वनराई बंधारे बांधण्याचा ग्रामस्थांच्या श्रमदानातून संकल्प केला आहे. देवसाने येथे केम डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पार, नार, वझडी, तापी (tapi), गोदावरी (godavari), कादवा (kadwa), गिरणा (girna) आदी सप्तनद्यांच्या उगमस्थानांवर वनराई बंधार्‍यांची निर्मिती केली आहे.

यामुळे वनराई बंधार्‍यांचा माध्यमातून भूजल पातळीत (Groundwater level) वाढ होण्यास मदत होणार आहे. देवसाने येथे ग्रामपंचायत (grampanchayat), वनविभाग (Forest Department) तसेच जलपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तापी नदीवरील तासाचा ओहळ येथे सरपंच प्रकाश गायकवाड, उपसरपंच जालिंदर गायकवाड, जलदुत नितीन गांगुर्डे, भनवड वन परिमंडळ अधिकारी नवनाथ गांगोडे, मार्गदर्शक देविदास कामडी,

संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष कमलाकर धुळे, मिशन जनक पोपट महाले आदींच्या हस्ते वनराई बंधारा बांधत शुभारंभ करण्यात आला. यावेळी वनरक्षक जगदीश चौधरी, अंकुश मोरे, रवींद्र धुळे, नामदेव धुळे, गोविंद गवळी, कृष्णा धुळे, खंडु गायकवाड, रंगनाथ धुळे, भगवान वाघमारे, किसन गुंबाडे, सूरज धुळे, काळू धुळे आदी उपस्थित होते.

जलपरिषदेने गाव तेथे वनराई बंधारा मोहीम हाती घेतल्याने या मोहिमेद्वारे वाहून जाणारे पाणी अडविण्यात येत आहे.यामुळे जंगली प्राणी, पशु पक्षी तसेच जनावरांना मोठा फायदा होत आहे. विशेष म्हणजे मांजरपाडा (देवसाने) पाणी प्रकल्पाच्या सप्तनद्यांच्या उगमस्थानी वनराई बंधार्‍यांची निर्मिती करत पाण्याचे महत्व जगभरात पटवून दिले आहे.या मोहिमेत वनविभाग तसेच ग्रामपंचायत उत्स्फूर्तपणे श्रमदानासाठी सहभागी होत आहे.

- नवनाथ गांगुर्डे, वनपरिमंडळ, अधिकारी, भनवड

देवसाने ग्रामपंचायतीने या मोहिमेत हिरारीने सहभाग नोंदविला आहे.पाण्याचे महत्व कळू लागल्याने इतर गावांनी आदर्श घेत या जलपरिषदेच्या मोहिमेत सहभागी व्हावे व वनराई बंधारे बांधावेत.

- जालिंदर गायकवाड, उपसरपंच देवसाने

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com